"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 04:21 PM2024-06-18T16:21:59+5:302024-06-18T16:33:51+5:30

आपले बाबा आता कधीच परत येणार नाहीत, हे त्या चिमुकल्याला माहीत नाही. तो वडिलांच्या नंबरवर व्हॉईस मेसेज पाठवतो. तो अनेकदा व्हिडीओ कॉल करण्याचाही प्रयत्न करतो. 

son sends voice message martyred colonel manpreet singh killed in kashmir operation | "पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक

"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक

देशात अनेक घटना घडत असतात. अशातच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका शहिदाच्या मुलाचा व्हॉईस मेसेज वाचून ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. सात वर्षांचा कबीर आपल्या वडिलांना "पप्पा फक्त एकदा परत या आणि परत मिशनवर जा..." असा व्हॉईस मेसेज आजही पाठवतो. आपले बाबा आता कधीच परत येणार नाहीत, हे त्या चिमुकल्याला माहीत नाही. तो वडिलांच्या नंबरवर व्हॉईस मेसेज पाठवतो. तो अनेकदा व्हिडीओ कॉल करण्याचाही प्रयत्न करतो. 

कबीरचे वडील कर्नल मनप्रीत सिंह हे गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये एका ऑपरेशनमध्ये शहीद झाले. गेल्या वर्षी १३ सप्टेंबर रोजी गडुल गावाच्या जंगलात सैनिकांसह कर्नल मनप्रीत सिंह यांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. कर्नल सिंह, मेजर आशिष धोंचक, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायूं भट आणि कॉन्स्टेबल प्रदीप सिंह हे शहीद झाले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला पण सर्वात मोठा फटका निरागस मुलाला बसला जो दररोज वडिलांच्या येण्याची वाट पाहतो.

कर्नल सिंह यांच्या पत्नी जगमीत यांनी सांगितलं की, त्यांच्या पतीने दोन चिनारची झाडं लावली होती. प्रेमाने त्या झाडांची नावं ही आपल्या मुलांच्या नावानुसार कबीर आणि वाणी अशी ठेवली होती. कर्नल सिंह हे काश्मीरमधील लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी खूप उत्साही होते. त्यांना रात्री मदतीसाठी फोन यायचे आणि ते देखील लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असायचे. स्थानिक लोक देखील त्यांना आपल्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलवायचे. 

कर्नल सिंह आणि त्यांची पत्नी जगमीत यांच्यात अवघ्या 32 सेकंदांचं शेवटचं संभाषण झालं होतं. मी ऑपरेशनमध्ये आहे, हे त्यांचे शेवटचे शब्द होते, त्यानंतर मी त्यांच्याशी कधीच बोलू शकले नाही असं जगमीत यांनी म्हटलं आहे.  अनंतनागची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू रुबिया सईद हिने कर्नल सिंह यांच्याबाबत सांगितलं आहे. तिने आठवणींना उजाळा दिला आहे. 

समाज घडवण्यात खेळाची महत्त्वाची भूमिका आहे यावर कर्नल सिंह यांचा विश्वास होता. ड्रग्सच्या आहारी गेलेले तसेच अनेक जण व्यसनी होते, ज्यांना त्यांनी योग्य मार्ग दाखवला. महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी प्रयत्न केले. कर्नल सिंह यांचे लक्ष हे क्रीडा आणि शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगला समाज निर्माण करण्यावर होतं. त्यांच्यासारखा सज्जन अधिकारी मी पाहिला नाही असंही म्हटलं आहे. 
 

Web Title: son sends voice message martyred colonel manpreet singh killed in kashmir operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.