बापरे! PUBGच्या चक्करमध्ये मुलाने आई-वडिलांनाच लावला चुना, अकाउंटमधून उडवले तब्बल 16 लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 08:13 PM2020-07-04T20:13:57+5:302020-07-04T20:24:11+5:30
आई-वडिलांना शंका येऊ नये, म्हणून हा मुलगा आईच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मेसेजदेखील डेलिट करायचा. यामुळे त्याच्या आई-वडिलांना मुलाचा कारणामा वेळेत कळू शकला नाही.
नवी दिल्ली - सध्या मोबाईलने तरुण पिढीला पार वेड लावले आहे. ही मुले मोबाईलमध्ये एवढी गर्क झाली आहेत, की त्यांना चांगल्या आणि वाईटाचेही भाण उरलेले नाही. यातच, मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या PUBG गेमने तर अनेकांना अक्षरशः पछाडले आहे. PUBGच्या वेडापायी पंजाबातील एका मुलाने तर आपल्या आई-वडिलांना तब्बल 16 लाख रुपयांचा चुना लावला. वडिलांनी बँक स्टेटमेन्ट पाहिल्यानंतर तर ते पार हादरूनच गेले.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहिती नुसार, संबंधित मुलगा 17 वर्षांचा आहे. त्याने PUBG गेमचे अकाउंट अपग्रेड करण्यासाठी हे पैसे खर्च केले. एवढेच नाही, त त्याने आपल्या मित्रांचेही PUBG अकाउंट अपग्रेड करून दिले. या मुलाकडे तब्बल तीन बँकांचे अकाउंट अॅक्सेस होते. संबंधित मुलाच्या वडिलांनी हे पैसे संकट काळासाठी आणि वैद्यकीय खर्चासाठी ठेवली होती. मुलाचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी सांगितले, आम्ही अभ्यासासाठी मुलाला मोबाईल दिला होता.
आई-वडिलांना शंका येऊ नये, म्हणून हा मुलगा आईच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मेसेजदेखील डेलिट करायचा. यामुळे त्याच्या आई-वडिलांना मुलाचा कारणामा वेळेत कळू शकला नाही. मात्र जेव्हा वडिलांनी अचानक बँक स्टेटमेंट पाहिले, तेव्हा त्यांना जबरदस्त धक्का बसला. त्यांचा बँक स्टेटमेंटवर तर सुरुवातीला विश्वासच बसेना. यानंतर आपल्या अकाउंटवरून 16 लाख रुपये गायब झाले आहेत आणि सर्व ट्रांझेक्शन आपल्या चिरंजिवानेच केले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. यानंतर जेव्हा तपास केला तेव्हा, हे सर्व पैसे ऑनलाईन गेमिंगवर उडाल्याचे निदर्शनास आले.
मध्य प्रदेशात एका मुलाची आत्महत्या -
पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेन्जनंतर आता PUBG गेमने अनेकांना वेड लावले आहे. सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. काही दिवसांपूर्वी आईने पबजी खेळण्यासाठी हवा असलेला इंटरनेट पॅक मारण्यासाठी नकार दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्ये प्रदेशातील भोपाळमध्ये घडली होती. इंटरनेट रिचार्जसाठी आईने पैसे दिले नाही, म्हणून या मुलाने आत्महत्येचे पाऊल उचलले.
महत्त्वाच्या बातम्या -
Photo : डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या गर्लफ्रेंडला Corona, अशी आहे ग्लॅमरस
...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?
दिल जीत लिया... PM मोदी थेट सीमेवर, नेटिझन्सच्या आनंदाला 'सीमा'च उरली नाही!
लडाखच्या 'कुरुक्षेत्रावर' मोदी असं काही बोलले; जवानांमध्ये १२ हत्तींचे बळ संचारले!
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!