स्नेहसंमेलनातूनच कलाकार घडतो : सोनाली मगदूम

By admin | Published: March 23, 2017 05:15 PM2017-03-23T17:15:45+5:302017-03-23T17:15:45+5:30

Sonakshi is the only artist who has made her Bollywood debut: Sonali Magdoom | स्नेहसंमेलनातूनच कलाकार घडतो : सोनाली मगदूम

स्नेहसंमेलनातूनच कलाकार घडतो : सोनाली मगदूम

Next
>* जयसिंगपूर जे.जे.मगदूममध्ये पारितोषिक वितरण
जयसिंगपूर : अंगभूत असलेल्या कलागुणांना सादर करण्याची संधी महाविद्यालयातील स्नेहसंमेलनातून मिळते. यातूनच आपल्या भविष्यातील जीवनामध्ये वाटचाल करण्यासाठी मार्ग सुकर बनतो आणि त्यातूनच कलाकार निर्माण होतो. यासाठी अशी स्नेहसंमेलने गरजेची आहेत, असे प्रतिपादन नगरसेविका ॲड.सोनाली मगदूम यांनी केले.
येथील डॉ.जे.जे.मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी ॲड.मगदूम बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे अध्यक्ष डॉ.आशितोष गुप्ता होते. पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन असा तीन दिवसीय उमंग कार्यक्रम उत्साहात पार पडला. नृत्य, गायन, एकांकिका, मुक अभिनय, फॅशन शो आदी कार्यक्रम झाले.
डॉ.आशितोष गुप्ता म्हणाले, कॉलेज जीवन समृध्द करावयाचे असेल तर महाविद्यालयातील स्नेहसंमेलने आवश्यक आहेत. संमेलनातून आपले व्यक्तिमत्वदेखील घडविता येते. याप्रसंगी डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजय मगदूम, डॉ.हरफळे, डॉ.राम लाडे, डॉ.अभिनंदन पाटील, डॉ.शाम श्रृंगारे, डॉ.विजय भगाटे, मगदूम अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.ए.के.गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वागत मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुहास नायडू यांनी केले. तीन दिवसीय झालेल्या कार्यक्रमाचे संयोजन डॉ.शिवानी गवंडे, डॉ.अनिल चंदनशिवे, डॉ.अनिरुध्द तगादे, डॉ.संग्राम पाटील, प्राची कुलकर्णी, धनश्री कुंभार, सोनाली सरकार, निरंजन आलेकर यांनी केले.
(प्रतिनिधी)
फोटो - २२०३२०१७-जेएवाय-०२
फोटो ओळी - जयसिंगपूर येथे डॉ.जे.जे.मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयात आयोजित पारितोषिक कार्यक्रमात बोलताना ॲड. सोनाली मगदूम, व्यासपीठावर विजय मगदूम, डॉ.आशितोष गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Sonakshi is the only artist who has made her Bollywood debut: Sonali Magdoom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.