NDA सरकारमुळे देशासमोर संकटे उभी -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:43 AM2020-06-24T03:43:15+5:302020-06-24T07:17:47+5:30

देशाची सुरक्षितता आणि भूभागाची अखंडता धोक्यात आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्ला केला.

Sonia Gandhi critize faces crisis due to NDA government | NDA सरकारमुळे देशासमोर संकटे उभी -सोनिया गांधी

NDA सरकारमुळे देशासमोर संकटे उभी -सोनिया गांधी

Next

शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : देश आज भयावह आर्थिक संकट, भयंकर महामारी आणि आता चीनशी सीमेवर मोठ्या संकटाला तोंड देत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही संकटे उभी ठाकली आहेत. देशाची सुरक्षितता आणि भूभागाची अखंडता धोक्यात आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्ला केला.
व्हिडिओद्वारा पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला त्या मार्गदर्शन करीत होत्या. सोनिया गांधी म्हणाल्या, देशासमोरील आर्थिक परिस्थिती आधीच्या अपेक्षेत आणखी गंभीर बनली आहे. मोदी सरकार प्रत्येक सूचनेकडे दुर्लक्ष करते आहे. सरकारी तिजोरीतून गरिबांच्या थेट हातात पैसे दिले जावेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे संरक्षण करून त्यांचे पोषण करणे याला सरकारचे प्राधान्य हवे; परंतु सरकारने पोकळ पॅकेज जाहीर केले. त्यात सकल देशी उत्पादनाच्या एक टक्क्यापेक्षाही कमी राजकोषीय प्रोत्साहन होते, असेही त्या म्हणाल्या.
पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले की,आपल्या सैनिकांनी ज्यासाठी बलिदान केले, ती परिस्थिती पंतप्रधानांनी स्वीकारली. चीनकडून जी आगळीक झाली ते मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याचे गांधी म्हणाले.
>आर्थिक परिस्थिती सावरण्यास लागणार मोठा काळ
आज भारताची ढासळती अर्थव्यवस्था ४२ वर्षांत प्रथमच तेजीकडून मंदीकडे घसरत चालली आहे. मला भीती वाटते की, यामुळे बेरोजगारी आणखी वाढेल, नागरिकांचे उत्पन्न घटेल, मजुरी कमी होऊन गुंतवणूक खाली येईल.याचा परिणाम देशाला त्यातून बाहेर पडायला फार मोठा काळ लागेल. हेसुद्धा सरकार व्यवस्था ठीक करील आणि ठोस आर्थिक धोरण राबवेल तेव्हाच शक्य आहे, असा इशारा गांधी यांनी दिला.सरकारला पूर्ण पाठिंबा दिल्यानंतरही ते लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याची व्यवस्था करण्यास तयार नाही. कोट्यवधी स्थलांतरित मजदूर, रोेजंदारीवरील लोकांसह अनेकांचा रोजगार गेला, असे त्या म्हणाल्या. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले की, ‘सरकारने पूर्ण धाडसाने महामारीला तोंड दिले नाही. चीनला सीमेवर तोंड देण्यात सरकारचा कमकुवतपणा दिसला. आम्ही पूर्ण शक्तीनिशी ते संकट निपटून काढणे गरजेचे होते. आमचा हा दुबळेपणा गंभीर संकटाचे कारण ठरेल.’

Web Title: Sonia Gandhi critize faces crisis due to NDA government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.