सोनिया गांधींना जामिन मिळाला म्हणून तिरुपतीला हाताचे बोट दान केले

By admin | Published: January 10, 2016 01:37 PM2016-01-10T13:37:27+5:302016-01-10T13:38:48+5:30

सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मिळाला म्हणून काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने तिरुपती येथील हुंडीमध्ये स्वत:च्या डाव्या हाताचे एक बोट कापून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Sonia Gandhi donated her finger to Tirupati as she got her bail | सोनिया गांधींना जामिन मिळाला म्हणून तिरुपतीला हाताचे बोट दान केले

सोनिया गांधींना जामिन मिळाला म्हणून तिरुपतीला हाताचे बोट दान केले

Next

ऑनलाइन लोकमत 

बंगळूरु, दि. १० -  नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मिळाला म्हणून काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने तिरुपती येथील हुंडीमध्ये स्वत:च्या डाव्या हाताचे एक बोट कापून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
इंदूवालू सुरेश असे या कार्यकर्त्याचे नाव असून, बंगळुरुपासून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या रामानगर येथे तो रहातो. २५ डिसेंबरला सुरेशने तिरुपती येथून जाऊन स्वत:च्या डाव्या हाताचे एक बोट कापून हुंडीमध्ये टाकले. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना न्यायालयाने हजर होण्यासाठी समन्स बजावले तेव्हा संपूर्ण काँग्रेस पक्ष चिंतेत होता. 
त्यावेळी मी तिरुपतीला माझ्या नेत्यांना जामीन मंजूर झाला तर, मी डाव्या हाताचा अंगठा देईन असा नवस बोललो होतो असे सुरेशने सांगितले. बोट कापणार असल्याची आपण आपल्या कुटुंबाला आगाऊ माहिती दिली नव्हती. मी मित्रासोबत थेट तिरुपतीला निघून गेलो असे सुरेशने सांगितले. 
मी हजार रुपयाच्या नोटेमध्ये बोट गुंडाळले आणि सोबत आभाराची चिठ्ठी हुंडीमध्ये टाकली अशी माहिती सुरेशने दिली. मी बोट कापले त्यावेळी मला वेदना झाल्या नाहीत. मी नंतर मंदिराजवळच्या रुग्णालयात गेले आणि तिथे उपचार केले. माझ्या गाडीचा एसी कॉम्र्पेसर रिपेअर करत असताना मी बोट गमावल्याचे डॉक्टरांना सांगितले. इंदूवालू सुरेश पेशाने ग्रॅनाईटचा व्यावसायिक आहे. 

Web Title: Sonia Gandhi donated her finger to Tirupati as she got her bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.