सोनिया गांधी अध्यक्ष म्हणून निवृत्त; राजकारणातून नव्हे - काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:48 PM2017-12-15T23:48:12+5:302017-12-15T23:48:22+5:30

सोनिया गांधी या अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त होत आहेत, राजकारणातून नव्हे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिले आहे. सोनिया गांधी या सार्वजनिक जीवनातून बाजूला होत असल्याच्या अटकळी त्यांनी फेटाळून लावल्या.

Sonia Gandhi retires as President; Explanation of Congress spokesman Surjewala - not from politics | सोनिया गांधी अध्यक्ष म्हणून निवृत्त; राजकारणातून नव्हे - काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण

सोनिया गांधी अध्यक्ष म्हणून निवृत्त; राजकारणातून नव्हे - काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण

Next

नवी दिल्ली : सोनिया गांधी या अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त होत आहेत, राजकारणातून नव्हे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिले आहे. सोनिया गांधी या सार्वजनिक जीवनातून बाजूला होत असल्याच्या अटकळी त्यांनी फेटाळून लावल्या.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्याकडे सोपविली आहे; पण त्या काँग्रेस पक्षाला मार्गदर्शन करीत राहतील. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सोनिया गांधी यांची भूमिका काय असेल? असा प्रश्न केला असता संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले की, माझी भूमिका सेवानिवृत्तीची आहे. त्यानंतर सुरजेवाला यांनी टष्ट्वीट करीत म्हटले आहे की, मीडियातील मित्रांना माझी विनंती आहे की, याबाबतच्या अटकळींवर लक्ष देऊ नये. याचा सकारात्मक विचार केला जावा.
सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, सोनिया गांधी अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत, राजकारणातून नव्हे.

Web Title: Sonia Gandhi retires as President; Explanation of Congress spokesman Surjewala - not from politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.