सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान अचानक ऐकू येऊ लागला सोनिया गांधीचा आवाज; सगळेच अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:29 PM2021-05-10T19:29:27+5:302021-05-10T19:30:51+5:30
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना अचानक येऊ लागला सोनिया गांधींचा आवाज; न्यायाधीश, वकिलांना हसू अनावर
नवी दिल्ली: देशातील कोरोना संकटाबद्दल आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावेळी एक अजब प्रसंग घडला. न्यायालयीन कामकाज सुरू असताना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीचं भाषण अचानक सुरू झालं. सुनावणीदरम्यान तांत्रिक समस्या येत असल्यानं न्यायमूर्ती आणि वकील वारंवार डिस्कनेक्ट होत होते. याचवेळी सोनिया गांधींचं भाषण सुरू झालं आणि सगळेच हसू लागले.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होतेवेळी कपिल सिब्बल यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना फोन केला आणि मला अनम्यूट करा अशी विनंती केली. यानंतर पी. चिदंबरम यांनीदेखील अनम्युट करण्यास सांगितलं. याचवेळी सोनिया गांधींचा आवाज ऐकू येऊ लागला. सोनिया गांधी कोरोना संकटावर बोलत होत्या. त्यावेळी कपिल सिब्बल यांनी आवाज बंद करण्यास सांगितलं.
कोरोना संकटात ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; ३० जूनपर्यंत लागू राहणार
लसीकरण धोरणाचा पुनर्विचार करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली होती. या प्रकरणी केंद्रानं आपलं म्हणणं लिखित स्वरुपात मांडलं आहे. लसीकरण धोरण न्यायसंगत असून त्यात सर्वोच्च न्यायालयानं दखल देण्याची आवश्यकता नाही, असं उत्तर केंद्राकडून न्यायालयाला देण्यात आलं.