ब्लॅक फंगसच्या औषधांचा साठा उपलब्ध करा; सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 03:51 PM2021-05-22T15:51:50+5:302021-05-22T15:53:14+5:30
Sonia Gandhi : ब्लॅक फंगसचा आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
नवी दिल्ली : देशात ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजाराच्या औषध तुटवड्यावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. (Congress interim chief Sonia Gandhi wrote to PM Modi requesting to take action on acute scarcity of Liposomal Amphotericin-B in the market)
केंद्र सरकारने केवळ राज्यांना ब्लॅक फंगसला महामारी रोग अधिनियम अंतर्गत महामारी म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ आहे की, या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचे पुरसे उत्पादन होईल आणि या औषधांचा पुरवठा देखील सुनिश्चित केला जाईल. उपचारासाठी रूग्णांना हे औषध मोफत उपलब्ध करून दिले जाईल, असे सोनिया गांधींनी म्हटले आहे.
याचबरोबर, ब्लॅक फंगसचा आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. Liposomal Amphotericin-B म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक औषध आहे. बाजारात याचा तुटवडा आहे. त्यामुळे हे औषध मिळण्यासाठी तात्काळ पावले उचलण्यात यावी. तसेच, हा आजार आयुष्मान भारत व बहुतांश आरोग्य विम्यांमध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे ब्लॅक फंगस या आजाराचा समावेश आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये करावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे नरेंद्र मोदींना केली आहे.
Congress interim chief Sonia Gandhi wrote to PM Modi requesting to take action on acute scarcity of Liposomal Amphotericin-B in the market and to cover Mucormycosis in Ayushman Bharat & other health insurance products pic.twitter.com/TRyDm1Xzv9
— ANI (@ANI) May 22, 2021
(सोनिया गांधींचं मोदींना भावनिक पत्र, 'त्या' मुलांच्या मदतीसाठी केली विनंती)
दरम्यान, कोरोनामुळे जी मुले अनाथ झाली आहेत, त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण द्यावे, अशी विनंती सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली होती. यामध्ये कोरोना महामारीत देशातील अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक युवक, शाळकरी मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. तर, अनेकांनी आपले पालकच या संकाटात गमावले आहेत. त्यामुळे या पीडित मुलांसोबत घडलेल्या अकल्पनीय दु:खामुळे आपण राष्ट्र म्हणून त्यांच्या पाठिशी उभा राहायला हवे, त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा, असे भावनिक पत्र सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना लिहिले होते.