सोनिया, राहुल पूरग्रस्त जम्मू-काश्मीरच्या दौ:यावर
By admin | Published: September 30, 2014 01:07 AM2014-09-30T01:07:04+5:302014-09-30T01:07:04+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी पूरप्रभावित जम्मू-काश्मीरचा दौरा केला.
Next
>अनंतनाग (जम्मू-काश्मीर) : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी पूरप्रभावित जम्मू-काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिल़े काँग्रेस कायम राज्यातील जनतेसोबत असल्याची ग्वाहीही या दोघांनी दिली़
येथून 12 कि. मी. अंतरावरील देहरुणा गावात राहुल यांनी पूरग्रस्तांना संबोधित केल़े काँग्रेस पक्ष कायम आपल्यासोबत आह़े आम्ही सरकारकडे आपल्या समस्या, आपल्या दु:खाला वाचा फोडू, असे राहुल गांधी यावेळी म्हणाल़े या नैसर्गिक आपत्तीवेळी आम्ही काश्मिरी जनतेसोबत आहोत़ काँग्रेस पक्ष, पक्षाचे युवा कार्यकर्ते, एनएसयूआय, आरजीएफ आणि पक्षाचे स्थानिक नेते असे सर्व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी झटत आहेत़ ही संकटाची घडी आहे; पण काश्मिरी जनता याला धैर्याने तोंड देईल, असे ते म्हणाल़े
सोनिया व राहुल गांधी दोन दिवसांच्या राज्याच्या दौ:यावर आहेत़ यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद त्यांच्या सोबत होत़े
पुरामुळे घर-संसार उद्ध्वस्त झालेली 18 कुटुंबे राजीव गांधी फाऊंडेशनद्वारा उभारण्यात आलेल्या तंबूंमध्ये आश्रय घेऊन आहेत़ सोनिया व राहुल यांनी या प्रत्येक तंबूला भेट दिली. (वृत्तसंस्था)
़़़आणि शहनाजा ढसाढसा रडली
काश्मिरातील भीषण महापुरात आपले घर आणि आयुष्याची सर्व पुंजी गमावलेली 35 वर्षीय शहनाजा आज सोनिया गांधी यांना भेटून ढसाढसा रडू लागली़ सोनिया दिसल्या तसा तिचा अश्रूचा बांध फुटला़ आपल्या तीन लहान लहान मुलींची दुर्दशा तिने सोनियांना सांगितली.सोनियांनाही हे बघून गहिवरून आल़े त्यांनी शहनाजाला मिठी मारत तिच्या तिन्ही मुलींशी हस्तांदोलन केल़े