धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

By मोरेश्वर येरम | Published: December 16, 2020 07:25 PM2020-12-16T19:25:23+5:302020-12-16T19:34:41+5:30

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बाबा राम सिंग असल्याची माहिती समोर आली असून ते कर्नालच्या सिंगरा गावातील रहिवासी आहेत.

sonipat a protester farmer shot himself dead kundali border | धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देकुंडली सीमेवर आतापर्यंत चार शेतकऱ्यांचा मृत्यूआंदोलक शेतकऱ्यानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीयरुग्णालयात नेण्याआधीच शेतकऱ्याचा मृत्यू

सोनिपत
सोनिपतच्या कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बाबा राम सिंग असल्याची माहिती समोर आली असून ते कर्नालच्या सिंगरा गावातील रहिवासी आहेत. बाबा राम सिंग हे त्यांच्या गावातील गुरुद्वारेतील ग्रंथी होते. ते गेले २० दिवस रोज शेतकरी आंदोलनासाठी कर्नाल ते कुंडली सीमा असा प्रवास करत होते. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा राम सिंग आजही आंदोलनात सहभागी होण्यासाठी कुंडली सीमेवर आले होते. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या मागे जाऊन त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. त्यांच्याकडे असलेल्या खासगी बंदुकीतून त्यांनी गोळी झाडल्याचं समजतं. बाबा राम सिंग यांच्या या कृत्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने पानीपत येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं आहे. राम सिंग यांचे पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचं कळतंय. 

कुंडली सीमेवरील सलग तिसऱ्या दिवशी आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू
कुंडली सीमेवर गेल्या तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची ही  तिसरी घटना आहे. तर आतापर्यंत या सीमेवर चार जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी सोमवारी आणि मंगळवारी सकाळी आंदोलनस्थळी प्रत्येकी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. वाढत्या थंडीमुळे वयस्कर शेतकऱ्यांची प्रकृती बिघडत आहे. यात ब्लडप्रेशर आणि तणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
 

Web Title: sonipat a protester farmer shot himself dead kundali border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.