सोनोवाल अखेर मुख्यमंत्रिपदी

By admin | Published: May 25, 2016 01:35 AM2016-05-25T01:35:15+5:302016-05-25T01:35:15+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्बानंद सोनोवाल यांनी आसामचे १४वे मुख्यमंत्री म्हणून मंगळवारी शपथ घेतली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि ज्येष्ठ नेते

Sonowal is finally the Chief Minister | सोनोवाल अखेर मुख्यमंत्रिपदी

सोनोवाल अखेर मुख्यमंत्रिपदी

Next

गुवाहाटी : भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्बानंद सोनोवाल यांनी आसामचे १४वे मुख्यमंत्री म्हणून मंगळवारी शपथ घेतली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्ताने पूर्वोत्तर राज्यात प्रथमच भाजपा सत्तारूढ झाला आहे. येथील खानपारा मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला. सोनोवाल यांच्यासह ११ जणांनी या वेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडो पीपल्स फ्रंट यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. ५४ वर्षीय सोनोवाल यांनी या वेळी आसामी भाषेत शपथ घेतली. राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Web Title: Sonowal is finally the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.