"सोनू निगमचे मुंडण करणा-यास 10 लाखांचे बक्षीस"

By admin | Published: April 19, 2017 09:17 AM2017-04-19T09:17:48+5:302017-04-19T12:03:46+5:30

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने 17 एप्रिल रोजी अजानसंदर्भात केलेल्या ट्विटचा वाद संपुष्टात येण्याऐवजी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

"Sonu Nigam's 10-Year Award for Shaving" | "सोनू निगमचे मुंडण करणा-यास 10 लाखांचे बक्षीस"

"सोनू निगमचे मुंडण करणा-यास 10 लाखांचे बक्षीस"

Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.19 - बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने 17 एप्रिल रोजी अजानसंदर्भात केलेल्या ट्विटचा वाद संपुष्टात येण्याऐवजी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण मुस्लिम नेता आणि पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमविरोधात फतवा काढला आहे.
 
एवढंच नाही तर सोनूचं मुंडण करुन त्याला जुन्या चपलांचा हार घालणा-या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली आहे. 
 
गायक सोनू निगम यांनी धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे. शिवाय, सोनू निगम हे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे वागत आहे, अशी टीका कादरी यांनी सोनू निगमवर केली आहे. 
 
यावर सोनूनं ही धार्मिक गुंडगिरी नाही का?, असा प्रश्न विचारत स्वतः मुंडण करुन घेणार असून मौलवी मुंडण करणा-यासाठी 10 लाख रुपये देण्यासाठी तयार राहा, असे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 
 
 
दरम्यान, मंगळवारी सोनूनं पुन्हा ट्विट करत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते. "मस्जिद किंवा मंदिरांवर भोंगे लावण्यावर परवानगी मिळू नये, असे सोनूने नव्याने ट्विट केले. त्यामुळे पुन्हा "भोंगे" या विषयावर यावर सोशल मीडियामध्ये लाउड चर्चा सुरू झाली आहे.  
(मशिदींवरील भोंग्यांविरोधात सोनू निगमचा बिगुल)
(सोनू निगमविरुद्ध गोवंडीत आंदोलन)
 
सोनू निगमने नव्याने केलेल्या ट्विटवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.  "नमाज अदा करण्यासाठी अजानाची गरज आहे. अत्याधुनिक युगात नमाजासाठी भोंग्यांची आवश्यकता नाही", असे परखड मत पटेल यांनी मांडले आहे.   
 
यावर  "समजूतदार व्यक्ती अशा प्रकारे मुद्दा समजून घेतात. तुमचा आदर आहे अहमद पटेल जी. अजान किंवा आरतीचा नाही तर हा मुद्दा भोंग्याचा आहे," अशी प्रतिक्रिया सोनूनं दिली.
(ट्विट केलं सोनू निगमनं, मनस्ताप मात्र सोनू सूदला)
नेमके काय केले होते सोनूनं ट्विट?
सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं 17 एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवत ट्विट केले होते.  "मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?", असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता.  या ट्विटवरुन कुणी सोनूचे समर्थन केले तर काहींनी त्याला खेडबोल सुनावले. 
 

Web Title: "Sonu Nigam's 10-Year Award for Shaving"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.