सोनू सूदकडे मदतीची मागणी करणारी ट्विट्स अचानक होऊ लागली डिलीट; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 03:59 PM2020-06-08T15:59:12+5:302020-06-08T16:06:02+5:30
मदतीची विनंती करणारी ट्विट्स अचानक एकाएकी डिलीट होऊ लागली डिलीट; स्क्रीनशॉट्स व्हायरल
मुंबई: लॉकडाऊनच्या काळात शहरांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करून देणारा अभिनेता सोनू सूदवर शिवसेना खासदार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. यानंतर सोनूनं काल रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. याआधी अनेक राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटींनी सोनूच्या कामाचं कौतुक केलं आहे. मात्र आता ट्विटरवर सोनूकडे मदत मागणारी ट्विट्स अचानक डिलीट होऊ लागल्याचं समोर आलं आहे.
सोनू सूद ने ट्विटर पर जिन आईडी के ट्वीट के जवाब में मदद की और घर पहुँचने पर जिन आईडी ने थैंक्स ट्वीट किया, उनमें से ज़्यादातर आईडी अपना पोस्ट डिलीट कर चुकी हैं।
— Dilip Mandal (@Profdilipmandal) June 7, 2020
ये लोग थे या सिर्फ आईडी थे?
सोनू के इमेज मैनेजर उनके वाल की सफ़ाई करें, उससे पहले सारे स्क्रीन शॉट ले लीजिए। pic.twitter.com/F9YXbg9ZbC
सोनू सूदकडे अनेकांनी सुरुवातीला ट्विटरवरूनच मदत मागण्यास सुरुवात केली. या ट्विट्सना सोनूनं रिप्लाय दिले. त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था केली. यामुळे सोनूचं खूप कौतुक झालं. सोनू सूदनं ट्विट्सना दिलेल्या उत्तराची बरीच चर्चा झाली. मात्र ती ट्विट्स आता डिलीट होत असल्याचा दावा एका माजी पत्रकारानं केला आहे. 'ही ट्विट्स करणारी माणसं होती की केवळ आयडी होते?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
So all these people who Sonu Sood tweeted to were fake? (Accounts deleted) pic.twitter.com/Umsbienwgc
— Ravi Ratan (@scribe_it) June 7, 2020
आपल्या गावी परतण्यासाठी अनेकांनी सोनूकडे मागितली. सोनूनं त्यांना लगेच रिप्लाय केला. त्यानंतर संबंधितांकडे त्यांची माहिती मागितली. सोनूनं त्यांची मदतही केली. संबंधित व्यक्ती आणि सोनू यांच्यातला संवाद ट्विटरवर होता. मात्र आता अचानक सोनूकडे मदत मागितलेल्या व्यक्तींनी केलेली ट्विट्स डिलीट झालेली आहेत. त्यामुळे आता काही जण यावरुन प्रश्न उपस्थित करत आहेत.
कृपा कर जरूरत मंद ही रिक्वेस्ट डालें । मैंने देखा है कि बहुत से लोग ट्वीट कर डिलीट कर रहें हैं जो उनका ग़लत लक्ष्य साबित करता है । इस से बहुत से ज़रूरत मंद प्रवासियों तक पहुँचने में हमें मुश्किल होगी। विश्वास की इस डोर में बाधा ना डालें 🙏
— sonu sood (@SonuSood) June 7, 2020
सोनू सूदनंदेखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही जण केवळ ट्विट करण्याच्या उद्देशानं मदत मागत आहेत. यातले काही गरजू नसल्याचं आपल्याही लक्षात आल्याचं सोनूनं म्हटलं आहे. 'मदतीची आवश्यकता असलेल्यांची विनंती करावी. अनेकजण ट्विट्स डिलीट करत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यातून त्यांचा उद्देश चुकीचा असल्याचं दिसतं. त्यामुळे गरजूंपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात,' असं सोनू सूदनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?
'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ
अरविंद केजरीवालांची तब्येत बिघडली; स्वत:ला केलं आयसोलेट, कोरोना टेस्ट होणार