देशातील शिक्षण क्षेत्रासाठी ठरणार का दूत, पुढाकार घेतोय सोनू सूद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 09:12 PM2020-09-02T21:12:52+5:302020-09-02T21:13:10+5:30
मी स्वत: इंजिनिअर असल्याचे सांगत सोनूने परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. आता, शिक्षण क्षेत्रात आपण क्रांतीकारी पाऊल टाकणार असल्याचं सोनू जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनूने याबाबत माहिती दिली.
मुंबई - बॉलिवूडमध्येसोनू सूद आपल्या सिनेमांसोबतच दिलदारपणामुळेही ओळखला जातो. सध्या सोनू मोकळ्या हाताने वेगवेगळ्या लाोकांची करतो आहे. ज्याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण देशात सोनू सूदची फॅन फॉलोइंग चांगलीच वाढली आहे. देशभरातून त्याची कामाची वाहवा होत आहे. लोकांकडून होणाऱ्या कौतुकामुळे आणि मदतीनंतर मिळणाऱ्या समाधानामुळे प्रॉब्लेम का सोल्यूशन म्हणजे सोनू सूद अशीच काहींची धारणा बनली आहे. सोनू सूदने मजूरांसाठी रोजगार देण्याचं काम हाती घेतलं असतानाच आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत केली होती. अजूनही अडचणींमध्ये अडकलेल्या लोकांना तो मदत करत आहे. सोनू सूद हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो त्याच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतो. अनेकजण सोनूला ट्वीटर वर टॅग करत मदत मागितल्याची उदाहरणे आहेत. मात्र काहीजण सोनूकडे इतर वैयक्तिक मदतही मागत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांत हजारो लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत त्याने केली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजूरांना घरी पोहोचवण्यापासून त्याने ही सुरूवात केली होती. त्यानंतर त्याने अनेक विद्यार्थी, गरीब लोकांची मदत केली. परदेशातूनही अनेकांना त्याने भारतात परत आणलं. त्याच्या कामाने प्रभावित होऊन आंध्र प्रदेशातील दोन गावात चक्क गावकऱ्यांनीच रोड तयार केला.
देशातील जेईई परीक्षाला सुरुवात झाली आहे, पण सोनू सूदने कोरोनाची देशातील परिस्थिती आणि पूरस्थितीचा संदर्भ देत सद्यपरिस्थितीच JEE आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मी स्वत: इंजिनिअर असल्याचे सांगत सोनूने परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. आता, शिक्षण क्षेत्रात आपण क्रांतीकारी पाऊल टाकणार असल्याचं सोनू जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनूने याबाबत माहिती दिली.
Coming soon 📚 pic.twitter.com/WKp9zUQS3r
— sonu sood (@SonuSood) September 2, 2020
लवकरच शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा करणार असल्याचं सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासाठी सोनू नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.