सूत्रे लवकरच राहुल गांधी यांच्याकडे

By admin | Published: August 24, 2016 05:09 AM2016-08-24T05:09:36+5:302016-08-24T05:09:36+5:30

सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे लवकरच पक्षाची सूत्रे सोपविली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Soon after Rahul Gandhi | सूत्रे लवकरच राहुल गांधी यांच्याकडे

सूत्रे लवकरच राहुल गांधी यांच्याकडे

Next


नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे लवकरच पक्षाची सूत्रे सोपविली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र श्रीमती गांधी यांना सहा आठवडे आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याने अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक सप्टेंबरातच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेव्हाच हा निर्णय होईल, असे दिसते.
सोनिया गांधी पुन्हा सक्रिय होईपर्यंत पक्षांतर्गत बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
मात्र राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्याच्या हालचाली लवकरच सुरू होतील. त्यासाठी त्यांच्या विश्वासातील नेत्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. त्यानुसार सचिन पायलट (राजस्थान), अशोक तंवर (हरयाणा), राज बब्बर (उत्तर प्रदेश), व्ही. एम. श्रीधरन (केरळ), अजय माकन (दिल्ली) आणि दिनेश गुंडू राव (कर्नाटक) यांच्या प्रदेशाध्यपदी नियुक्त्या झाल्याच आहेत.
सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे सध्याही काँग्रेसची सारी सूत्रे राहुल यांच्याच हाती
असून, पक्षाशी संबंधित सर्व
निर्णय त्यांना विचारूनच घेतले जात आहेत. (सिटिझन.कॉम)
>तरुणांना महत्त्व
काँग्रेसमध्ये तरुणांना महत्त्व देण्याचे प्रयत्न जोरात सुरू असून, काही जुन्या चेहऱ्यांना मात्र न हलविण्याचे निश्चित ठरल्याचे दिसते.
त्यात कमलनाथ, शीला दीक्षित, गुलाम नबी आझाद हे असून, ते राहुल गांधी यांच्याही विश्वासातील आहेत.

Web Title: Soon after Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.