काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल

By admin | Published: June 2, 2016 03:14 AM2016-06-02T03:14:35+5:302016-06-02T03:14:35+5:30

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाची मागणी जोरात सुरू असून, राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पक्षात मोठ्या फेरबदलांना सुरुवात होईल

Soon a big change in the Congress | काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल

काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल

Next

शीलेश शर्मा, नवी दिल्ली
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाची मागणी जोरात सुरू असून, राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पक्षात मोठ्या फेरबदलांना सुरुवात होईल. त्याची सुरुवात झाली असून, राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राहुल गांधी यांच्या पसंतीचे नेते अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले जाणार आहेत.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यांमध्ये हे बदल होतील, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय पातळीवरील बदलांपूर्वी काही राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले जातील. त्यात उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक असेल. तिथे पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेथील जातीय समीकरणे लक्षात घेता, तिथे नवा प्रदेशाध्यक्ष नेमला जाईल. बिहारमध्ये जातीय समीकरणांच्या आधारे नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होईल. त्यानंतर अर्थातच महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे बदल होतील, असे सांगण्यात येते. अर्थात, या राज्यांतील बदलांना प्राधान्य दिले जाईल की, केंद्रीय बदलांनंतर ते केले जातील, हे सांगणे अवघड आहे.
राहुल गांधी यांचे सारे लक्ष सध्या पंजाब व उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांकडे आहे. त्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रामुख्याने या सरचिटणीसांची मदत घेईल. यावेळी प्रथमच दोन्ही राज्यांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहरनामा तयार करण्याचे ठरवले जात आहे. उत्तर प्रदेशातील १५0 जागांचे लक्ष्य ठरवले असून, त्यासाठी प्रशांक किशोर यांच्या टीममधील १५0 जण या मतदारसंघांत तळ ठोकून आहेत. पंजाबमध्येही प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता प्रशांत किशोर यांच्या कलेने पुढे जायचे ठरवले आहे. राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करावे व प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावे, अशी मागणी त्यांनी आजच केली.राहुल गांधी यांना अध्यक्षपद देतानाच, सोनिया गांधी यांना त्यावरील स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. शिवाय, थंडावलेले संसदीय मंडळाला पुनरुज्जीवित केले जाणार असून, सोनिया गांधी त्याच्या प्रमुख असतील. निवडणुकांसाठी उमेदवार या मंडळामार्फत निश्चित केले जातात. राहुल गांधी यांना सोबत स्वत:ची टीम लागेल. त्यामुळे अनेक उपाध्यक्ष हे त्यांच्या पसंतीचे तरुण व नवे चेहरे असतील.

Web Title: Soon a big change in the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.