पत्रकाराला मारहाण होताच, पत्नीने झाडल्या गोळ्या, महिलेवर कौतुकाचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 04:19 AM2018-02-06T04:19:54+5:302018-02-06T04:20:06+5:30
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका पत्रकारावर काही जणांनी हल्ला करताच, त्याच्या पत्नीने त्याच्या बचावासाठी बाहेर येऊ न हल्लेखोरांवर रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या.
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका पत्रकारावर काही जणांनी हल्ला करताच, त्याच्या पत्नीने त्याच्या बचावासाठी बाहेर येऊ न हल्लेखोरांवर रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. त्यामुळे हल्लेखोर पळून गेले आणि पत्रकार बचावला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आबिद अली या पत्रकारावर हल्ला होताच, त्याच्या पत्नीने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पत्रकार आबिद अली व एक इसम त्याच्या घराबाहेर काही बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यात घराच्या आतमध्ये पत्रकार आणि संबंधित इसम गेटच्या बाहेर उभे असून, त्याच्या हातात काही कागदपत्रे दिसत आहेत. अचानक आणखी चार जण तिथे येतात आणि गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या आबिद अली यांना मारहाण सुरू करतात. त्यांना खाली पाडण्यात आले आििण हल्लेखोºयांपैकी एकाने काठीने तर इतर लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
मारहाण सुरू होताच, आबिद यांनी आरडाओरडा सुरू केला. तो ऐकून त्याची पत्नी हातात रिव्हॉल्वर घेऊ न बाहेर आली. आपल्या पतीला सोडा, असे तिने हल्लेखोरांना सांगितले. पण हल्लेखोर ऐकत नाही, हे पाहून तिथे रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच, हल्लेखोरांनी पळ काढला. तोपर्यंत आबिद अली याने पत्नीच्या हातातील रिव्हॉल्वर काढून स्वत:कडे घेतले आणि हल्लेखोरांवर उगारले, असे दिसत आहे. (वृत्तसंस्था)
>कारण काय?
या हल्ल्याचे कारण काय, हल्लेखोर कोण होते व पत्रकाराकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का, हल्लेखोर व पत्रकार यांच्यात काय वाद होते, हे स्पष्ट झालेले नाही.