लवकरच, गाडी लायसन्सची सॉफ्ट कॉपीही ठरणार वैध पुरावा

By admin | Published: July 8, 2016 05:41 PM2016-07-08T17:41:39+5:302016-07-08T17:41:39+5:30

ड्रायव्हर आणि गाडी मालकांना वाहन परवाना आणि अन्य कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जवळ बाळगण्याची अनुमती मिळावी यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे.

Soon, valid proof that a car is a soft copy of a license | लवकरच, गाडी लायसन्सची सॉफ्ट कॉपीही ठरणार वैध पुरावा

लवकरच, गाडी लायसन्सची सॉफ्ट कॉपीही ठरणार वैध पुरावा

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ - ड्रायव्हर आणि गाडी मालकांना वाहन परवाना आणि अन्य कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जवळ बाळगण्याची अनुमती मिळावी यासाठी  रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर, पोलिस तपासणीच्यावेळी सॉफ्ट कॉपी ग्राहय धरली जाईल. 
 
वाहन नोंदणी, इन्शूरन्स कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे. वाहन नोंदणी आणि परवान्यांसाठी राज्यातील कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्जदाराला अर्ज करता येईल. यामुळे अनेक प्रक्रियांसाठी लागणारा वेळ वाचणार आहे तसेच सध्याच्या नियमानुसार वाहन परवान्याची मुदत संपल्यानंतर महिन्याभरात वाहन परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. 
 
ही मुदत वर्षभरापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मोटर वाहन कायद्यातील बदलांसाठी प्रस्ताव दिला आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात या बदलांवर चर्चा होऊ शकते. चारवर्षावरील मुलांना हेलमेटसक्ती बंधनकारक करण्याचाही प्रस्ताव आहे. लोकांनी आरटीओ कार्यालयात येण्यापेक्षा प्रक्रिया ऑनलाइन करण्यावर भर आहे. 
 
जेणेकरुन भ्रष्टाचाराला आळा बसेल. सुरक्षा वाढवण्याबरोबर या सेवा लोकाभिमुख करणे हा सुधारणांचा उद्देश आहे. आरटीओकडून वाहन परवाना आणि रजिस्ट्रेशन कार्ड स्मार्ट चीपच्या स्वरुपात दिले जाईल.
 
 

Web Title: Soon, valid proof that a car is a soft copy of a license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.