विठ्ठल-रुक्मिणी मातेसाठी अत्याधुनिक स्वयंपाकगृह

By admin | Published: July 12, 2015 09:58 PM2015-07-12T21:58:17+5:302015-07-12T21:58:17+5:30

१२पंड०९,१०

Sophisticated kitchen for Vitthal-Rukmini Mata | विठ्ठल-रुक्मिणी मातेसाठी अत्याधुनिक स्वयंपाकगृह

विठ्ठल-रुक्मिणी मातेसाठी अत्याधुनिक स्वयंपाकगृह

Next
पंड०९,१०
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नैवेद्य बनविण्यासाठी असलेले अत्याधुनिक स्वयंपाकगृह. (छाया - सचिन कांबळे)
सचिन कांबळे :
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अत्याधुनिक स्वयंपाकगृह बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, २० जुलैपासून ते वापरात येणार असल्याची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली.
विठ्ठल मंदिरातील चार खणाच्या जागेत ज्या ठिकाणी पूर्वीचे स्वयंपाकगृह होते, त्याठिकाणीच नव्याने आकर्षक पध्दतीचे स्वयंपाकगृह बांधण्याचे काम सुरु आहे. या नवीन स्वयंपाकगृहामध्ये किचन क˜ा, बेसीन, भांडी धुण्यासाठी मोरी, साहित्य ठेवण्यासाठी रॅक आदींची सोय करण्यात येणार आहे.
नैवेद्य बनवायचे काम सर्वार्ंना दिसावे यासाठी स्वयंपाकगृहाच्या विठ्ठल मंडपाच्या बाजूला काच बसवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वयंपाकगृह आकर्षक दिसण्यासाठी वरच्या बाजूला पी.ओ.पी. करण्यात येत आहे. इतरत्र रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या स्वयंपाकगृहामध्ये फ्रीज, मिक्सर अशी अद्ययावत उपकरणे ठेवण्यात येणार आहेत. तसेच नैवेद्याचे मोठे ताट नेता यावे यासाठी या स्वयंपाकगृहाला मोठा दरवाजा करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी पाच लाख रूपये खर्च येणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन व कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी सांगितले.
पुरातन इमारत तशीच!
विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नैवेद्य बनविण्यासाठी अत्याधुनिक पध्दतीच्या स्वयंपाकगृहाचे बांधकाम करत असताना पुरातन इमारतीला धक्का लागणार नाही याची दखल घेण्यात आली आहे. मूळ इमारत तशीच ठेवून नवीन काम सुरू करण्यात आले.

Web Title: Sophisticated kitchen for Vitthal-Rukmini Mata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.