जवानांना मिळणार अत्याधुनिक शस्त्रे; ५,३६६ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:15 AM2018-03-25T00:15:36+5:302018-03-25T00:15:36+5:30
चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तैनात जवानांसाठी सरकार लवकरच नव्या रायफल्स खरेदी करणार आहे. यात लाइट मशिन गन आणि क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाइन्स (रायफल) यांचा समावेश आहे. हे काम फास्ट ट्रॅक प्रोसिजर (एफटीपी) द्वारे सुरू आहे.
नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तैनात जवानांसाठी सरकार लवकरच नव्या रायफल्स खरेदी करणार आहे. यात लाइट मशिन गन आणि क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाइन्स (रायफल) यांचा समावेश आहे. हे काम फास्ट ट्रॅक प्रोसिजर (एफटीपी) द्वारे सुरू आहे.
निवडक विदेशी कंपन्यांसाठी ७२,४०० असॉल्ट रायफल्स, १६,४७९ लाइट मशिन गन (एलएमजी) आणि ९३,८९५ सीक्यूबी कार्बाइन्ससाठी शुक्रवारी सुरुवातीच्या निविदा जारी केल्या आहेत. याची किंमत ५,३६६ कोटी असेल. संरक्षण खरेदी परिषदेकडून (डीएसी) मंजुरी मिळाल्यानंतर दहा दिवसांच्या आत आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) निघतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एक वर्षाच्या संबंधित कंपन्या एका वर्षाच्या आत ही शस्त्रास्त्रे देशाला सोपवतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय लष्कराने २००५ मध्येच सीक्यूबी कार्बाइन्सची मागणी ३८२ बटालियनसाठी केली होती.
फेब्रुवारीत दिली मंजुरी
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील डीएसीने असॉल्ट रायफल्ससाठी १,७९८ कोटी आणि सीक्यूबी कार्बाइन्ससाठी १,७४९ कोटी रुपयांच्या खर्चाला १६ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे. तर, लाइट मशिन गनसाठी १,८१९ कोटी रुपयांच्या खर्चाला १३ फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली.