"मम्मी-पापा सॉरी, JEE परीक्षा..."; ह्रदयद्रावक सुसाईड नोट लिहून संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:33 IST2025-01-09T16:31:52+5:302025-01-09T16:33:54+5:30
बारावीमध्ये ९० टक्के गुण घेऊन जेईई परीक्षेची तयारी करत असलेल्या एका विद्यार्थ्यांनी आईवडिलांची माफी मागत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

"मम्मी-पापा सॉरी, JEE परीक्षा..."; ह्रदयद्रावक सुसाईड नोट लिहून संपवलं आयुष्य
Crime News: जेईई परीक्षेची तयार करत असलेल्या एका विद्यार्थ्याने आईवडिलांची माफी मागून थेट आयुष्य संपवल्याची घटना घडली. अभिषेक लोधा असे, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याने आयुष्य संपवण्यापूर्वी आईवडिलांच्या नावे एक चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी ती सुसाईड नोट जप्त केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमुळे चर्चेत असलेल्या कोटामध्ये गेल्या २४ तासात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
हरयाणातील नीरज जाट या विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री वसतिगृहातील आपल्या रुममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर बुधवारी पीजीमध्ये राहत असलेल्या मध्य प्रदेशातील अभिषेक लोधा याने आत्महत्या केली.
अभिषेक मध्य प्रदेशातील मुथरालाल गावचा रहिवासी आहे. तो जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटामध्ये आला होता. पण, परीक्षेत पास आत्मविश्वास नसल्याने त्याने आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी आईवडिलांची मागितली माफी
अभिषेकचे वडील शेतकरी आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांचं नेहमी अभिषेकसोबत बोलणं व्हायचं. तो असं काही करेल, असं आम्हाला जाणवलं नाही.
पोलिसांना अभिषेकच्या खोलीत सुसाईड नोट मिळाली. अभिषेकने आजी-आजोबा, आईवडिलांची माफी मागितली आहे. सॉरी मम्मी-पापा, मी जेईई परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही, असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने अभिषेकने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.