शाळेच्या भिंतींवर-रस्त्यावर लिहिले ‘सॉरी’, अज्ञात प्रियकराचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 08:43 AM2022-05-27T08:43:22+5:302022-05-27T08:44:06+5:30

प्रियकराचे कृत्य? पोलिसांकडून शोध सुरू

'Sorry' written by unknown boyfriend on school walls-street | शाळेच्या भिंतींवर-रस्त्यावर लिहिले ‘सॉरी’, अज्ञात प्रियकराचा शोध सुरू

शाळेच्या भिंतींवर-रस्त्यावर लिहिले ‘सॉरी’, अज्ञात प्रियकराचा शोध सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका खासगी शाळेबाहेर विचित्र कृत्य पाहायला मिळाले आहे. मंगळवारी शाळेच्या भिंतींवर आणि  परिसरातील रस्त्यांवर सर्वत्र लाल रंगाने मोठमोठ्या अक्षरात सॉरी लिहिलेले दिसले. सगळीकडे ‘सॉरी’ लिहिलेले पाहून परिसरातील रहिवाशांना आश्चर्य वाटले, लगेचच त्यांनी कामाक्षिपाल्या पोलीस स्थानकात याबाबत माहिती दिली. 

सुनकडकट्टे भागातील शांतीधाम शाळेकडे जाणाऱ्या पायऱ्या, भिंती आणि रस्त्यावर ‘सॉरी’ लिहिलेले रहिवाशांनी पाहिले. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १२ च्या दरम्यान ही घटना घडल्याचे समजते. “आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले, याप्रकरणी कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही, दोन तरुणांनी हे काम केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याचे पाेलिसांनी सांगितले. 

प्रियकराचे कृत्य? 
असे करण्यामागचे कारण समोर आलेले नाही. काही समस्या शाळा प्रशासनाकडून सोडवल्या जात नसल्यामुळे नाराज असलेल्या विद्यार्थ्यांचा यात हात असू शकतो अशी शाळेच्या अधिकाऱ्यांना शंका असल्याचे पोलिसांनी सांगितले. पण, प्रेम प्रकरणातून एखाद्या तरुणाने असे केले असू शकते असा पोलिसांना संशय आहे. शाळेकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पण, कामाक्षिपाल्या पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत. हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेमागे तर्कवितर्क मांडत आहेत. 

Web Title: 'Sorry' written by unknown boyfriend on school walls-street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.