राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात घुमला सूर निरागसचा आवाज

By Admin | Published: May 3, 2016 06:52 PM2016-05-03T18:52:31+5:302016-05-03T22:13:30+5:30

63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर यंदा मराठी कलाकारांनी मोहर उमटवली आहे.

The sound of a melodious voice in the national awards ceremony | राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात घुमला सूर निरागसचा आवाज

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात घुमला सूर निरागसचा आवाज

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 3- 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर यंदा मराठी कलाकारांनी मोहर उमटवली आहे.  ‘सैराट’फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने रिअल लाईफमध्येही कौतुकास्पद कामगिरी केल्यानं तिचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.  राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी नंदिता धुरी, शशांक शेंडे, महेश काळे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या राष्ट्रीय पुरस्कारांत सैराटमधल्या आर्चीची खूपच चर्चा आहे. ‘सैराट’मधील अभिनयानंतर राष्ट्रीय पुरस्कार आणि शिक्षणामध्येही अव्वल येऊन आर्ची अर्थात रिंकूने चाहत्यांवर छाप पाडली आहे. राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात यावेळी 'सूर निरागस हो'चा आवाजही घुमला आहे.
----
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट : बाहुबली
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन (पीकू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (तनू वेड्स मनू रिटर्न्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साली (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - रिंगण
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- महेश काळे ( कट्यार काळजात घुसली)
विशेष दखल : वॉइस ओव्हर आर्टिस्ट झ्र हरिष भीमानी (मला लाज वाटते)
विशेष दखल : रिंकू राजगुरू (सैराट) (मराठी)
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म -अमोल देशमुख झ्र औषध (मराठी)
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट- पायवाट (मराठी)
सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट - दारवठा (मराठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) - कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट गीतकार  -वरुण ग्रोवर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट गायिका  -मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट पटकथा-संवाद - पीकू आणि तनू वेड्स मनू (विभागून)
सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) - विशाल भारद्वाज (तलवार)
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) - जुही चतुर्वेदी (पीकू)
सर्वोत्कृष्ट नृत्य झ्र रेमो (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सेट डिझाईन - बाजीराव मस्तानी
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट - बाहुबली

Web Title: The sound of a melodious voice in the national awards ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.