सरकारच्या निषेधाने संमेलनाचे सूप, धर्मा पाटील आत्महत्येची साहित्यिकांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 04:04 AM2018-02-19T04:04:09+5:302018-02-19T04:04:18+5:30

महाराज सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात रविवारी मांडण्यात आला.

The soup of the assembly by the government's protest, Dharma Patil interfere with the suicide of the suicide victims | सरकारच्या निषेधाने संमेलनाचे सूप, धर्मा पाटील आत्महत्येची साहित्यिकांकडून दखल

सरकारच्या निषेधाने संमेलनाचे सूप, धर्मा पाटील आत्महत्येची साहित्यिकांकडून दखल

Next

प्रज्ञा केळकर-सिंग/स्नेहा मोरे
महाराज सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात रविवारी मांडण्यात आला. सरकारच्या असंवेदनशीलतेबद्दल नाराजी व्यक्त करत, शासनाने सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समजून घेत प्रामाणिकपणे सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली.


आगामी संमेलनासाठी ७ निमंत्रणे
आगामी ९२व्या संमेलनासाठी ७ निमंत्रणे आली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहुपुरी शाखा (जि. सातारा), विदर्भ साहित्य संघाची अमरावती आणि वाशीम शाखा, साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठान (अंमळनेर), एज्युकेशन ट्रस्ट-नायगाव बाजार (जि. नांदेड) आणि बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय, तसेच ‘भिलार’ या पुस्तकांच्या गावाच्या निमंत्रणाचा त्यात समावेश असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी सांगितले.

१६ ठराव संमत करून
९१व्या संमेलनाची सांगता
अध्यक्षीय ४ ठरावांसह १६ ठराव टाळ््यांच्या गजरात संमत करून, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ९१व्या संमेलनाची सांगता झाली.
राज्य शासनाने ‘मराठी लर्निंग अ‍ॅक्ट’ हा कायदा तातडीने संमत करावा, बडोदे विमानतळास महाराज सयाजीराव गायकवाड यांचे नाव द्यावे. महाराजांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान बहाल करावा आणि गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, छत्तीसगड या सीमावर्ती राज्यांनी राज्य मराठी अकादमी स्थापन करावी आदी ठराव अध्यक्षीय अधिकारात करण्यात आले. विविध क्षेत्रांत मराठीच्या वापराबाबत श्वेतपत्रिका प्रकाशित करावी, बडोदा येथे गुजरात मराठी अकादमी आणि स्वतंत्र अनुवाद अकादमीची स्थापना आदी मागण्यांचे साकडे घालण्यात आले.

Web Title: The soup of the assembly by the government's protest, Dharma Patil interfere with the suicide of the suicide victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.