वडील विकायचे कुल्फी-मिठाई; लेक आधी झाला इंजिनिअर मग IAS, 3 महिन्यांत केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:17 AM2023-05-01T10:17:55+5:302023-05-01T10:27:49+5:30

मिठाई विक्रेत्याचा मुलगा एके दिवशी देशाच्या सर्वोच्च सेवेत रुजू होईल, याची कोणाला कल्पनाही नव्हती. त्यांनी केवळ आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले नाही तर संपूर्ण कुटुंबाचं नाव मोठं केलं आहे.

sourabh swami ias rank sweet seller son passed upsc exam in first attempt | वडील विकायचे कुल्फी-मिठाई; लेक आधी झाला इंजिनिअर मग IAS, 3 महिन्यांत केली तयारी

वडील विकायचे कुल्फी-मिठाई; लेक आधी झाला इंजिनिअर मग IAS, 3 महिन्यांत केली तयारी

googlenewsNext

हरियाणातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सौरभ स्वामी यांची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. मिठाई विक्रेत्याचा मुलगा एके दिवशी देशाच्या सर्वोच्च सेवेत रुजू होईल, याची कोणाला कल्पनाही नव्हती. त्यांनी केवळ आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले नाही तर संपूर्ण कुटुंबाचं नाव मोठं केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील चरखी दादरी येथे एका सामान्य कुटुंबात ते राहत होते. वडील रोहतक चौकात मिठाई आणि कुल्फी विकायचे. 

1 डिसेंबर 1989 रोजी त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. वडील अशोक स्वामी यांनी आपल्या मुलाचे नाव सौरभ स्वामी असं ठेवलं. सौरभ लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते आणि त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या कुटुंबाला गरिबीच्या खाईतून बाहेर काढले. दादरी येथील एपीजे शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते दिल्लीला आले. येथे त्यांनी भारतीय विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये B.Tech केले. 

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना बंगळुरूमध्ये नोकरी मिळाली. खासगी नोकरीमुळे त्यांनी UPSC प्रीलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर ते घसरून पडले त्यामुळे त्यांना तीन महिन्यांची विश्रांती घेण्यास सांगण्यात आले. सौरभ स्वामी यांनी या तीन महिन्यांत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यासाठी ते दिल्लीला गेले होते. तेथे, कोचिंग आणि अभ्यासाद्वारे, त्याने 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये 149 वा रँक मिळाला. त्यानंतर LBSNAA मसुरी येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर ते 2015 मध्ये IAS अधिकारी झाले.

सौरभ स्वामी हे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या श्रीगंगानगरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून तैनात आहे. त्यांनी 2017 मध्ये राजस्थानच्या RJS अनुभूती स्वामीशी लग्न केले. सौरभ स्वामी यांची आई पुष्पा स्वामी यांनी बी.एड. तर वडील अशोक स्वामी आठवी पास आहेत. सौरभ हे दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहेत. सौरभ यांनी आयुष्यात काहीतरी मोठं करावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. आयएएस अधिकारी होऊन त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: sourabh swami ias rank sweet seller son passed upsc exam in first attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.