दक्षिण कोरिया देणार भारताला १० अब्ज डॉलर

By Admin | Published: May 18, 2015 11:52 PM2015-05-18T23:52:30+5:302015-05-18T23:52:30+5:30

भारतातील पायाभूत क्षेत्राचा विकास, स्मार्ट शहरे, रेल्वे, विद्युतनिर्मिती यासह विविध क्षेत्रांच्या विकासासाठी भारत व दक्षिण कोरिया यांनी परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला

South Korea to give 10 billion dollars to India | दक्षिण कोरिया देणार भारताला १० अब्ज डॉलर

दक्षिण कोरिया देणार भारताला १० अब्ज डॉलर

googlenewsNext

पायाभूत विकासासाठी सहकार्य : पंतप्रधानांचा तीन देशांचा दौरा अखेरच्या टप्प्यात
सेऊल : भारतातील पायाभूत क्षेत्राचा विकास, स्मार्ट शहरे, रेल्वे, विद्युतनिर्मिती यासह विविध क्षेत्रांच्या विकासासाठी भारत व दक्षिण कोरिया यांनी परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला असून, दक्षिण कोरियाने भारताला १० अब्ज डॉलर देण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने दक्षिण कोरियात आले आहेत. मोदी व दक्षिण कोरियाच्या अध्यक्ष पार्क ग्यून ह्ये यांनी विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. परस्पर संबंध वरच्या पातळीवर नेण्यासाठी संरक्षण, व्यापार व गुंतवणूक हे मुद्दे आधीच्या सहकार्यात मिळवण्याचा निर्णय या दोन नेत्यांनी घेतला आहे. अध्यक्ष पार्क व पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी दक्षिण कोरियाच्या प्रगतीची प्रशंसा केली. दक्षिण कोरियाच्या जलद विकासामुळे आशियायी शतक अधिक बळकट झाल्याचे मोदी यांनी सांगितले. ३ राष्ट्रांच्या दौऱ्यात मोदी आता अखेरच्या टप्प्यात आहेत.


भारत व दक्षिण कोरिया यांच्यात सात करार झाले असून, त्यात दुहेरी कर टाळण्याचा डीटीएए हा करारही करण्यात आला आहे.
अध्यक्ष पार्क व पंतप्रधान मोदी यांच्या वाटाघाटीनंतर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून, दक्षिण कोरिया हा भारताच्या अ‍ॅक्ट इस्ट मोहिमेतील अत्यावश्यक भागीदार आहे अशी नोंद यात करण्यात आली आहे.
भारताच्या सर्व समस्यांवरील उपाय म्हणजे विकास असून, देशातील सव्वाशे कोटी लोकांना जोडून घेणे अत्यंत कठीण काम आहे; पण मी लोण्यावर रेघ ओढणाऱ्यांपैकी नाही, तर मला दगडावर रेघ ओढण्याची सवय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सेऊल येथील क्यूंग विद्यापीठात ते भारतीय समुदायासमोर बोलत होते.
 

Web Title: South Korea to give 10 billion dollars to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.