रिपब्लिक ऑफ कोरियाच्या फर्स्ट लेडी किम केओन ही सांभाळतात अब्जावधींचा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:01 AM2023-09-06T11:01:47+5:302023-09-06T17:54:30+5:30

G20 Summit : गुरुग्राममधील ओबेरॉय हॉटेलमध्ये कोरियन प्रतिनिधींच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

south korea glamorous first lady coming to g20 summit india has successful business women career | रिपब्लिक ऑफ कोरियाच्या फर्स्ट लेडी किम केओन ही सांभाळतात अब्जावधींचा बिझनेस

रिपब्लिक ऑफ कोरियाच्या फर्स्ट लेडी किम केओन ही सांभाळतात अब्जावधींचा बिझनेस

googlenewsNext

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली G20 च्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था दिल्ली ते गुरुग्रामपर्यंतच्या हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. त्यापैकी एक दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल  (Yoon Suk Yeol) आणि त्यांची पत्नी किम केओन ही  (Kim Keon Hee) आहेत. गुरुग्राममधील ओबेरॉय हॉटेलमध्ये कोरियन प्रतिनिधींच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. पण, सगळ्यात जास्त चर्चेत आहेत, त्या कोरियाच्या फर्स्ट लेडी किम केओन ही आणि त्यांची ग्लॅमरस स्टाइल…

कोरियाच्या फर्स्ट लेडी म्हणून किम केओन ही यांना जगातील सर्व मोठ्या मंचांवर अनेकदा सहभागी होताना पाहिले आहे. त्यांच्या डायनॅमिक पर्सनॅलिटीचे  जगातील मोठ्या नेत्यांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, त्या राजकीय परिषदांमध्ये जितक्या उत्साहाने भाग घेतात, तितक्याच सक्षमतेने अब्जावधी रुपयांचा बिझनेसही सांभाळतात. तसेच, दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी असण्यासोबतच त्यांच्या ग्लॅमरस स्टाइलची अनेकदा चर्चा होते, पण लोकांना त्यांच्या बिझनेसबद्दल फारशी माहिती नसते. 

किम केओन ही यांना डिझाईनिंग आणि पेंटिंगमध्ये रस आहे आणि त्यांनी कला विषयात पदवी प्राप्त केली आहे. किम केओन ही 'कोवाना कंटेंट्स' नावाची कंपनी चालवतात, त्या कला प्रदर्शनांचे आयोजन करतात. एक प्रकारे ही कंपनी कलाकारांसाठी आर्ट क्युरेटर आणि इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून काम करते. किम केओन ही या कंपनीच्या सीईओ आणि अध्यक्ष आहेत. या कंपनीची वार्षिक उलाढाल अनेक अब्ज डॉलर्सची आहे.

G20 मध्ये कोरियन संस्कृतीची झलक पाहायला मिळणार
किम केओन ही यांना पाहून त्यांच्या वयाचा अंदाज कोणी लावू शकत नाही. वयाच्या 51 व्या वर्षीही किम केओन ही या अतिशय अॅक्टिव्ह जीवन जगतात. दरम्यान, यंदा दिल्लीत होणार्‍या G20 शिखर परिषदेत लोकांना कोरियन कला आणि संस्कृतीला पाहण्याची संधीही मिळणार आहे. ही संधी भारत आणि कोरियासाठी देखील महत्त्वाची आहे, कारण 2023 मध्ये दोन्ही देशांमधील संबंधांना 50 वर्षे पूर्ण होणार आहेत.

Web Title: south korea glamorous first lady coming to g20 summit india has successful business women career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.