खूशखबर! मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात लवकरच आगमन; वाटचालीसाठी अनुकूल स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:54 AM2021-06-04T08:54:41+5:302021-06-04T08:55:09+5:30
नैऋत्य माेसमी पावसाची पुढील वाटचाल वेगाने हाेणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या सरी लवकरच येण्याची चिन्हे आहेत.
नवी दिल्ली : मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला. नियाेजित वेळेपेक्षा मान्सून दाेन दिवस उशिरा दाखल झाला तरी पुढे अनुकूल परिस्थिती असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे लवकर माेसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन हाेणार आहे. गोव्यात ५ जूनला तर त्यानंतर महाराष्ट्रात येणार आहे.
महाराष्ट्रासाठी गुडन्यूज
नैऋत्य माेसमी पावसाची पुढील वाटचाल वेगाने हाेणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या सरी लवकरच येण्याची चिन्हे आहेत.
मान्सूनने गुरुवारी केरळच्या किनारपट्टीवर धडक दिली. केरळसाेबतच लक्षद्वीप, दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण अरबी समुद्राचा भाग मान्सूनने व्यापला आहे.
पुढील दाेन दिवसांमध्ये माेसमी पाऊस पुदुच्चेरी, कर्नाटक आणि तामिळनाडूचा आणखी काही भाग व्यापणार आहे.
पुढील तीन दिवसांमध्ये केरळ, लक्षद्वीप, माहे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.