नैऋत्य मान्सूनची देशातून माघार
By admin | Published: October 1, 2016 01:34 AM2016-10-01T01:34:08+5:302016-10-01T01:34:08+5:30
नैऋत्य मान्सून संपल्याचे भूविज्ञान मंत्रालयातर्फे शनिवारी जाहीर केले असून, सुरुवातीच्या सामान्यापेक्षा अधिक पावसाच्या अंदाजापेक्षा यंदा प्रत्यक्षात काही ठिकाणी खूप कमी,
नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून संपल्याचे भूविज्ञान मंत्रालयातर्फे शनिवारी जाहीर केले असून, सुरुवातीच्या सामान्यापेक्षा अधिक पावसाच्या अंदाजापेक्षा यंदा प्रत्यक्षात काही ठिकाणी खूप कमी, काही भागांत खूपच अधिक आणि ७२ टक्के भागांमध्ये सामान्य पाउस झाला आहे. देशाच्या ७२ टक्के भागात सामान्य पाउस झाला आणि १३ टक्के भागांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच अधिक होते, अशी माहिती आज दिल्लीत देण्यात आली.
येत्या ४८ तासांत मराठवाड्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तिथे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात पावसाचा फारसा जोर नव्हता. मात्र शेवटच्या टप्प्यात पावसाने मराठवाड्यात तसेच सोलापूर, सांगली भागांत हजेरी लावल्याने तिथेही समाधानाचे वातावरण दिसत आहे.