सर्वशक्तिनिशी सार्वभौमत्व जपू

By admin | Published: November 29, 2015 03:08 AM2015-11-29T03:08:41+5:302015-11-29T03:08:41+5:30

भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे. परंतु आपल्या सर्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण लष्करी शक्तीचा वापर करण्यासही देश सज्ज आहे,असे प्रतिपादन तीनही

Sovereignty of sovereignty is Japu | सर्वशक्तिनिशी सार्वभौमत्व जपू

सर्वशक्तिनिशी सार्वभौमत्व जपू

Next

हासीमारा (पश्चिम बंगाल) : भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे. परंतु आपल्या सर्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण लष्करी शक्तीचा वापर करण्यासही देश सज्ज आहे,असे प्रतिपादन तीनही दलांचे प्रमुख राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी केले.
भारतीय वायुसेनेच्या १८ व्या आणि २२ व्या स्क्वाड्रनला राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आले. या दोन्ही स्क्वाड्रनद्वारे उत्कृष्ट मिग २७ विमानाचे संचालन केले जाते. शांतता आणि युद्ध काळातही भारताच्या पूर्वेकडील हवाई सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार जिल्ह्यात भारत-भूतान सीमेजवळ या स्क्वाड्रनचे आधार तळ आहे. भारताच्या ईशान्य सीमेवर पाळत ठेवण्याचे काम हे स्क्वाड्रन करते.
वायुसेनेच्या या दोन्ही स्क्वाड्रनला सन्मानित केल्यावर मार्गदर्शन करताना राष्ट्रपती म्हणाले, आमच्या सशस्त्र दलांच्या क्षमतेमुळे जगात भारताचे महत्त्व वाढले आहे. आम्ही शांततेसाठी वचनबद्ध आहोत. मात्र आमच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी आम्ही संपूर्ण शक्ती पणाला लावू आणि लष्करातील आमचे शूरवीर यावेळी एकजूट राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.
भारतीय वायुसेना म्हणजे देशाच्या लष्करी शक्तीचे वैशिष्ट्य असल्याचे सांगून राष्ट्रपतींनी महिला आणि पुरुष जवानांचे तोंडभरून कौतुक केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Sovereignty of sovereignty is Japu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.