खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या
By admin | Published: June 28, 2016 07:03 PM2016-06-28T19:03:42+5:302016-06-28T19:35:36+5:30
परिसरात खरिप हंगामातील ७० टक्के पेरण्या आटोपताच पावसाने दडी मारल्याने बळीराजा वरुणराजाकडे पाहत असल्याचे दिसत आहे.
आगार : परिसरात खरिप हंगामातील ७० टक्के पेरण्या आटोपताच पावसाने दडी मारल्याने बळीराजा वरुणराजाकडे पाहत असल्याचे दिसत आहे.
गेल्या तीन वर्षापासून पावसाच्या लहरीपणाचा फटका सहन करीत चालू वर्षी बर्यापैकी हजेरी लावल्याने २० जूनपासून खरिप हंगामातील पेरणीला प्रारंभ करण्यात आला. २० ते २२ जूनदरम्यान पाऊस झाल्याने आजपर्यंत ७० टक्के पेरण्या आटोपल्या असल्या तरी अचानक पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांच्या चिंता वाढल्या आहेत. दर दिवशी ढगाळ वातावरण असले तरी पाण्याचा एकही थेंब बरसत नसल्याने शेतकरी राजा आकाशाकडे चातकासारखा पाहत आहे जर एक दोन दिवसात पाऊस पडला नाही तर काही पेरण्या उलटण्याची भीती शेतकरीवर्ग व्यक्त करीत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)