वर्दीतील माणुसकी! दिवे विकणाऱ्या वृद्ध महिलेसाठी पोलिसाचा पुढाकार, गरीबांच्या चेहऱ्यावर आणलं हसू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 09:26 AM2020-11-15T09:26:46+5:302020-11-15T09:32:14+5:30
Sanjay Varma :"खाकी"तील समाजभान दाखवणारी एक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका वृद्ध महिलेला मदतीचा हात दिला आहे.
मिर्झापूर - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाच्या संकटात पोलीस अहोरात्र काम करत आहेत. मात्र याच दरम्यान वर्दीतील माणुसकीचं दर्शन घडलं आहे. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये "खाकी"तील समाजभान दाखवणारी एक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका वृद्ध महिलेला मदतीचा हात दिला आहे. एक महिला रस्त्याच्या कडेला दिवे विकत होती. मात्र रात्र झाली तरी तिचे दिवे विकले जात नव्हते. या महिलेसाठी पोलिसाने पुढाकार घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झापूरमध्ये पोलीस अधिकारी गस्त घालत होते. त्यावेळी एका रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला लहान मुलाला घेऊन मातीचे दिवे विकायला बसली होती. ही महिला सकाळपासून दिवे विकण्यासाठी बसली होती, मात्र तिच्या दिव्यांची विक्रीच झाली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्याला समजलं. त्यामुळे अधिकाराऱ्याने या वृद्ध महिलेचे सर्व दिवे खरेदी केले आणि जाणाऱ्या येणाऱ्या लोकांमध्ये ते वाटले.
भीक मागणाऱ्या व्यक्तीला नीट पाहिल्यानंतर आणि अधिक चौकशी केली असता पोलिसांना बसला मोठा धक्का https://t.co/fcQSK6Tu5Z#Police
— Lokmat (@MiLOKMAT) November 14, 2020
कोरोनच्या काळातील ही लोकांची पहिलीच दिवाळी आहे. सण असल्याने बाजारात गर्दी आहे. मातीचे दिव्यांची विक्री अनेकजण करत आहेत. अशीच एक वृद्ध महिला लहान मुलांनासोबत दुकान लावून दिवे विकत होती. या वेळी पोलिसांचे पथक देखील गस्त घालत होते. पोलीस अधीक्षक संजय वर्मा यांनी रात्री दहा वाजता रस्त्याच्या कडेला मातीचे दिवे विकणाऱ्या त्या महिलेला पाहिलं. रात्र झाली तरी देखील या वृद्ध महिलेचे दिवे विकले गेले नसल्याचं त्यांना समजलं. तेव्हा त्यांनी त्या वृद्ध महिलेकडून सर्वच्या सर्व दिवे खरेदी केले.
'खाकी'तील समाजभान! रात्र झाली तरी महिलेचे दिवे विकले गेले नाहीत, पोलिसाने जे केलं ते पाहून कराल सलाम
संजय वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दिवाळी असल्याने आम्ही गस्त घालत होतो. रात्र होत होती आणि सकाळपासून बसलेल्या वृद्ध महिलेचे दिवे विकले गेले नव्हते म्हणून ती अतिशय उदास होती. हेच पाहून त्यांनी तिचे सर्वच्या सर्व दिवे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यातील काही दिवे आपल्यासोबत असलेल्या शिपायांमध्ये देखील वाटले. उरलेले दिवे घरी आणले. यामुळे कमीतकमी त्यांच्या चेहऱ्यावर मी एक समाधान पाहू शकलो. " एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कौतुकास्पद! कर्तव्य पार पाडत वेळात वेळ काढून 'हा' पोलीस अधिकारी देतोय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणhttps://t.co/eRrNyAAqFO#education#Police#Students
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2020
'खाकी'तील समाजभान! गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार, नोकरी सांभाळून देतोय शिक्षण
देशात शाळा-महाविद्यालये बंद असून ऑनलाईन क्लासेसवर अधिक भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एका पोलिसाने पुढाकार घेतला आहे. थान सिंह असं या पोलिसाचं नाव असून ते दिल्ली पोलीस दलात कार्यरत आहेत. गरीब मुलांना ते शिकवतात. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ असलेल्या साई मंदिरात त्यांचे वर्ग भरत आहेत. लॉकडाऊनमुळे काही विद्यार्थ्यांना शिकवणी बंद करावी लागली होती. गरीब घरांतून येणाऱ्या अनेक मुलांकडे स्मार्टफोन, संगणक आणि इंटरनेटच्या सुविधा नाहीत त्यामुळे ते ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. म्हणूनच थान सिंह यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला.
ती रडत होती... जोरजोराने पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटत होती; जाणून घ्या नेमकं झालं काय?https://t.co/bD93CzNxiw#Police
— Lokmat (@MiLOKMAT) November 14, 2020