सपा-काँग्रेस आघाडीच्या प्रचाराला जाणार नाही - मुलायमसिंग यादव
By admin | Published: January 29, 2017 09:23 PM2017-01-29T21:23:21+5:302017-01-29T21:36:11+5:30
एकीकडे तिकिटे कापल्यामुळे एकामागून एक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत, तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांनी
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - वर्चस्वाच्या लढाईतून समाजवादी पक्षात निर्माण झालेला वाद वरकरणी मिटल्याचे दिसत असले तरी, पक्ष आणि यादव परिवारात असंतोषाचे निखारे अद्यापही धुमसत आहेत. एकीकडे तिकिटे कापल्यामुळे एकामागून एक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत, तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी केलेल्या आघाडीबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत या आघाडीच्या प्रचाराला जाणार नसल्याची घोषणा केली आहे.
मुलायम यांच्या पवित्र्यामुळे आघाडी झाल्यानंतर विजय निश्चित मानून चालत असलेल्या अखिलेश आणि राहुल गांधी यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. आज एएनआय या वृतसंस्थेशी बोलताना मुलायमसिंग यादव यांनी समाजवादी पार्टीने काँग्रेसशी केलेल्या आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली. मुलायमसिंग म्हणाले, "उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष एकट्याने निवडणूक लढवून जिंकण्यास सक्षम होता. त्यामुळे मी काँग्रेसशी आघाडी करण्याच्या विरोधात होतो. आता मी विधानसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणार नाही," आमच्या नेत्यांची तिकिटे कापली गेली आहेत, त्यांची पाच वर्षे वाया जाणार आहेत अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
#WATCH Mulayam Singh Yadav says he is against SP-Congress alliance and he won't campaign for them pic.twitter.com/rvdlFR13vt
— ANI UP (@ANINewsUP) 29 January 2017