Corona-Cyclone: “शरियतमध्ये मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने कोरोना, दोन चक्रीवादळासारखी संकटं आली”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 10:34 PM2021-06-03T22:34:51+5:302021-06-03T22:38:18+5:30
Corona-Cyclone: सपा खासदार एसटी हसन यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना अजब विधान केले आहे.
मुरादाबाद: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा सुरू असतानाच दुसरीकडे पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर दोन चक्रीवादळे येऊन धडकली. यावरून आता उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी यासाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले असून, मोदी सरकारने शरियतमध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे कोरोना आणि तौक्ते तसेच यास चक्रीवादळासारखी नैसर्गिक संकटे आल्याचे अजब वक्तव्य केले आहे. (sp mp st hasan said corona and recent cyclones are result of interference in sharia law by modi govt)
गेल्या सात वर्षांमध्ये मोदी सरकारने केवळ धार्मिक भेदभाव निर्माण करण्यासंदर्भातील कायदे बनवले. सरकारच्या या भेदभावामुळेच कोरोनाची महामाही आणि दोन चक्रीवादळे येऊन गेली आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) या कायद्यांच्या माध्यमातून मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले, असा आरोपही एस.टी.हसन यांनी केला. यापूर्वीही हसन यांनी वादग्रस्त वक्तव्य केली असल्याचे सांगितले जाते.
“ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं”; अलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तर
देशातील ९९ टक्के लोक धार्मिक
देशातील ९९ टक्के लोक धार्मिक आहेत. जग चालवणारा आणि जगामध्ये न्याय देणारा कोणीतरी वर आहे असे आपल्यापैकी सर्वजण मानतात. जमिनीवरील लोकांनी न्याय दिला नाही तर, ईश्वरी शक्ती न्याय करते. गेल्या काही दिवसांत मृतदेह कशा प्रकारे हाताळले गेले. त्यांना मृत्यूनंतरचा सन्मान नाकारण्यात आला हे आपण पाहिले असेल, असे हसन म्हणाले.
धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!
सर्व वाटा केवळ श्रीमंतांचा आहे
मृतदेह नदीत सोडण्यात आले. श्वानांनीही मृतदेहांचे लचके तोडले. श्मशानांमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडेही उपलब्ध नव्हती. या सरकारला गरीब जनतेची चिंता नाहीय. सर्व वाटा केवळ श्रीमंतांचा आहे, अशी टीका हसन यांनी केली. ज्याने श्रीमंतांना जन्म दिलाय त्यानेच गरीबांना जन्म दिलाय. तो सर्वांचा मालक आहे, असे सांगत देशातील सध्याची परिस्थिती पाहता माझ्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात आणखीन नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल, अशी शक्यता हसन यांनी वर्तवली आहे.