एस.पी. त्यागी यांना जामीन
By admin | Published: December 27, 2016 12:39 AM2016-12-27T00:39:51+5:302016-12-27T00:39:51+5:30
अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात ९ डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेले माजी हवाई दल प्रमुख एस.पी. त्यागी यांना सोमवारी येथे एका विशेष न्यायालयाने
नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात ९ डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेले माजी हवाई दल प्रमुख एस.पी. त्यागी यांना सोमवारी येथे एका विशेष न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
न्यायालयाने त्यागी यांना स्पष्ट केले आहे की, पुराव्यांवर प्रभाव पाडण्याचा आणि तपासात अडथळा निर्माण
करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये. अन्य दोन आरोपी संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांच्या जामीन याचिका न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. यावर ४ जानेवारी रोजी निर्णय होणार आहे. एस. पी. त्यागी यांच्या वकील मनेका गुरूस्वामी यांनी सांगितले की, जर तपासाला वेळ लागत असेल, तर एस. पी. त्यागी यांना जामिनापासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही. त्यांनी असाही दावा केला की, या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन चार वर्षे झाली तरी सीबीआयने त्यागींविरुद्ध कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. (लोकमत न्यूज नेटवर्क)