यान चंद्रावर, पैसा खिशात; मून इकाॅनाॅमी दशकभरात दीडपटीने वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 01:26 PM2023-08-25T13:26:12+5:302023-08-25T13:27:26+5:30
तरुणांच्या हातालाही मिळणार काम
लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले. अख्खे जग त्यासाठी भारताचे काैतुक करत आहे. चंद्रयान माेहिमेच्या यशानंतर देशातील स्पेस इकाॅनाॅमीदेखील राॅकेटवर स्वार झाली आहे. याला बळ देत आहे.
मून इकाॅनाॅमी-
विक्रम लॅंडर चंद्रावर उतरल्यानंतर आता पुढच्या टप्प्याची चर्चा सुरू झाली असून, अंतराळ क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये माेठी तेजी दिसली आहे. या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे बाजार भांडवल तब्बल २.५ अब्ज डाॅलर म्हणजे सुमारे २० हजार काेटी रुपयांनी वाढले आहे. अंतराळ यानासाठी लागणाऱ्या औद्याेगिक वायू पुरवठादार असाे किंवा आवश्यक माॅड्यूल्स व यंत्रणा पुरविणारी कंपनी, या क्षेत्रात महिनाभरातच सरासरी ३० टक्क्यांपेक्षा जास्त तेजी आली आहे. या कंपन्यांचे शेअर्स चांगला परतावा देतील. येणाऱ्या दशकात सुमारे दीड पटीने मून इकाॅनामी वाढणार आहे.
या उपकरणांची असते गरज
लॅंडर माॅड्यूल आणि प्राेपल्शन माॅड्यूलसाठी लागणाऱ्या बॅटरी, मिश्र धातू, इलेक्ट्राॅनिक सिस्टीम डिझाइन, लाॅंच व्हेइकलसाठी इंजिन आणि बूस्टर पंप, नेव्हिगेशन, सेन्सर, इत्यादी उपकरणे आणि सुटे भाग अंतराळ माेहिमेसाठी लागतात.
नाेकऱ्यादेखील वाढणार
चंद्रयान- ३ च्या यशामुळे टेलिकम्युनिकेशन्स, रिमाेट सेन्सिंग, सॅटेलाइट नेव्हिगेशन क्षेत्रासह आवश्यक उपकरणे आणि सुट्या भागांची मागणी वाढेल. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये माेठ्या प्रमाणात नाेकऱ्या उपलब्ध हाेतील, असे तज्ज्ञांचे
मत आहे.
अशी वाढणार मून इकाॅनाॅमी