VIDEO: अंतराळात फडकला तिरंगा!, व्हिडिओ पाहून तुमचाही ऊर अभिमानानं भरुन येईल...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 11:47 AM2022-08-15T11:47:00+5:302022-08-15T11:48:50+5:30
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं जोरदार सेलिब्रेशन संपूर्ण देशभर केलं जात आहे. देशाच्या या महत्वाच्या क्षणाचे साक्षीदार म्हणून स्पेस किड्स इंडियानं अंतराळात तिरंगा फडकवला आणि याचा जबरदस्त व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
नवी दिल्ली-
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं जोरदार सेलिब्रेशन संपूर्ण देशभर केलं जात आहे. देशाच्या या महत्वाच्या क्षणाचे साक्षीदार म्हणून स्पेस किड्स इंडियानं अंतराळात तिरंगा फडकवला आणि याचा जबरदस्त व्हिडिओ देखील शेअर केला आहे. संघटनेचं म्हणणं आहे की हे सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानासाठी आहे आणि त्या लोकांसाठी देखील आहे जे भारताचा अभिमान वाढवण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करत आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि 'हर घर तिरंगा'च्या मोहिमेला व्हिडिओच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवण्याची मोहीम राबवली जात आहे. Space Kids India ही देशासाठी तरुण शास्त्रज्ञांची निर्मिती करणारी एरोस्पेस संस्था आहे. या दिवशी देशाच्या विविध भागातून अशी चित्रे समोर येत आहेत, ज्यामध्ये लोक तिरंगा फडकवत आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांनी सियाचीन ग्लेशियरवर तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हटल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
"केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात, आज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भारतीय किंवा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात ज्यांचे प्रेम आहे. भारत हा आमचा तिरंगा आहे. अभिमानाने फडकावत आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी लालकिल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना म्हणाले.
#WATCH Indian Army troops recite the national anthem at the Siachen Glacier after unfurling the national flag on the occasion of the 76th Independence Day
— ANI (@ANI) August 15, 2022
(Source: Indian Army) pic.twitter.com/Dhd8JjiXDY