SpiceJet मध्ये महिला प्रवाशांसाठी आरक्षित जागा

By admin | Published: March 6, 2017 04:53 PM2017-03-06T16:53:30+5:302017-03-06T16:53:30+5:30

स्पाईसजेटने एकट्याने प्रवास करणा-या महिलांसाठी आरक्षित जागा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

Space for women passengers in SpiceJet | SpiceJet मध्ये महिला प्रवाशांसाठी आरक्षित जागा

SpiceJet मध्ये महिला प्रवाशांसाठी आरक्षित जागा

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - एअर इंडियानंतर आता स्पाईसजेटनेही एकट्याने प्रवास करणा-या महिलांसाठी आरक्षित जागा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बोईंग 737s आणि Q-400s ची चौथी रांग महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. 
 
(आता एअर इंडियामध्ये महिलांना आरक्षण)
 
'संपुर्ण विमानातील बसण्याची व्यवस्था पाहता पुरुषांना खिडकीच्या बाजूची सीट देण्यात येणार आहे. महिलांना सर्व सेवांचा प्रथम लाभ मिळावा तसंच सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी पहिली आणि मधली सीट आरक्षित असणार आहे. एकट्याने प्रवास करणा-या महिलांनी कोणताही अडथळा किंवा त्रास होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या आणि मधील सीटमधून हालचाल करणं सुरक्षा आणि आणीबीणीच्या परिस्थितीत जास्त सोपं असतं, त्यामुळे महिलांसाठी या जागा आरक्षित ठेवत आहोत', असं स्पाईसजेटने म्हटलं आहे.
 
महिलांसाठी आरक्षित जागा ठेवण्याची सुरुवात एअर इंडियाने केली. गतवर्षी 18 जानेवारीपासून एअर इंडियाने आंतरदेशीय विमानांमधील इकॉनॉमिक क्लासमध्ये एकट्याने प्रवास करणा-या महिलांसाठी एक रांग म्हणजेच सहा जागा आरक्षित ठेवल्या. मुंबई - नेवार्क विमानात एका महिला प्रवाशाचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. 
 

Web Title: Space for women passengers in SpiceJet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.