‘सपा सरकार अल्पमतात’
By admin | Published: October 24, 2016 03:37 AM2016-10-24T03:37:04+5:302016-10-24T03:37:04+5:30
उत्तरप्रदेशातील सपाचे अखिलेश यादव यांचे सरकार अल्पमतात असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे. तोपर्यंत या सरकारच्या धोरणात्मक निर्णयावर प्रतिबंध आणावेत, असे मत भाजपने व्यक्त केले आहे.
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
उत्तरप्रदेशातील सपाचे अखिलेश यादव यांचे सरकार अल्पमतात असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे. तोपर्यंत या सरकारच्या धोरणात्मक निर्णयावर प्रतिबंध आणावेत, असे मत भाजपने व्यक्त केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा म्हणाले की, लुटीच्या वाटणीसाठी सपातील नेत्यात हा संघर्ष सुरु आहे. राज्य सरकारमधील चार मंत्र्यांना हटविल्याच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, अखिलेश यादव यांची प्रतिमा उजळविण्याचा हा प्रयत्न आहे. कारण, हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारला निरोप देण्याची वेळ आता जवळ आली आहे. सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मंत्र्यांना हटविण्याचे नाटक आपल्या नाकर्तेपणावर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न आहे. अखिलेश यादव आणि त्यांच्या सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे.
शर्मा म्हणाले की, लोकांनी या सरकारला यापूर्वीच नाकारले आहे. त्यामुळे बरखास्तीच्या अशा नाटकांमुळे काही फायदा होणार नाही. लोक भाजपच्या बाजूने झुकलेले आहेत. आपण जर घर सांभाळू शकत नसताल तर राज्य कसे चालविणार असा सवालही त्यांनी केला.