नात्यात ‘चिंगारी’, अॅपवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी पत्नी करवून घेते असे काही, पतीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 09:04 AM2020-07-31T09:04:23+5:302020-07-31T09:45:32+5:30
व्हिडीओमध्ये स्लीम दिसावं म्हणून, पत्नी मला अनेकदा उपाशी ठेवायची. तसेच याबाबच विचारणा केल्यास भांडण करायची, असा आरोप संबंधित पतीने केला आहे.
भोपाळ - गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराचा परिणाम नातेसंबंधांवर होत असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. आपली पत्नी अॅपवर फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी आपल्याकडून चित्रविचित्र करामती करवून घेते, असा आरोप एका त्रस्त पतीने केला आहे.
या व्यक्तीने सांगितले की, विवाह झाल्यापासूनच त्याच्या पत्नीला टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याचा छंद होता. नव्याची नवलाई असताना मलालाही असे व्हिडीओ तयार करण्यात कुठलीही अडचण वाटत नव्हती, तसेच कुठलीही तक्रार नव्हती. मात्र नंतरच्या काळात पत्नी माझ्याकडून डाएटिंग करवून घ्यायला लागली. तसेच चित्रविचित्र करामती करायला सांगू लागली.
व्हिडीओमध्ये स्लीम दिसावं म्हणून, पत्नी मला अनेकदा उपाशी ठेवायची. तसेच याबाबच विचारणा केल्यास भांडण करायची, असा आरोप संबंधित पतीने केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे या जोडप्याचे याआधी एकदा समुपदेशन झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा या पत्नीने नव्या अॅपवर फॉलोअर वाढवण्यासाठी पतीकडून चित्रविचित्र कारनामे करवून घेण्यास सुरुवात केली.
माझी पत्नी कधी कधी मला चित्रविचित्र मेकअप करायला लावते, तर कधीकधी कुठल्यातरी गाण्याच्या तालावर नाचायला लावते. मात्र असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर ऑफीसपासून नातेवाईकांपर्यंत सर्वजण माझी मस्करी करतात. मात्र माती पत्नी हे ऐकून घ्यायला तयार नाही, असा आरोप पतीने केला आहे.
याबाबत मानसोपचार तज्ज्ञ शैला अवस्थी यांनी सांगितले की, सध्या नवीन आलेल्या चिंगारी नावाच्या अॅपवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी ही महिला आपल्या पतीवर दबाव आणून त्याच्याकडून चित्रविचित्र व्हिडीओ चित्रीत करून घेते. एवढेच नाही तर स्वत:ला स्लिम ठेवले नाही तर नवीन मित्रमंडळी बनवून त्यांच्यासोबत व्हिडीओ बनवेन अशी धमकी ती पतीला देते. दरम्यान, असा तगादा लावणे बंद करण्याचा सल्ला मी तिला दिला आहे. दरम्यान, दोघांचेही समुपदेशन सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल