अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणे ‘जोकच’- करण जोहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2016 03:32 AM2016-01-23T03:32:28+5:302016-01-23T03:32:28+5:30
चित्रपट निर्माते करण जोहर यांनी शुक्रवारी असहिष्णुतेबाबत केलेल्या विधानामुळे नवे वादळ उठले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलणे म्हणजे जगातील सर्वात मोठा विनोद
जयपूर : चित्रपट निर्माते करण जोहर यांनी शुक्रवारी असहिष्णुतेबाबत केलेल्या विधानामुळे नवे वादळ उठले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलणे म्हणजे जगातील सर्वात मोठा विनोद असल्याचे त्यांनी म्हटल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
लोकशाही हा दुसरा मोठा जोक असावा असे मला वाटते. आपण खरेच लोकशाहीवादी आहोत काय, याचे मला आश्चर्य वाटते. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे काय आहे, असा सवालही त्यांनी केला.
जोहर यांनी समलिंग संबंधांवर ‘दोस्ताना’ तर विवाहबाह्ण संबंधावर ‘कभी अलविदा ना कहना ’ यासारखे चित्रपट बनविले आहेत. ज्या ठिकाणी जातो तेथे माझ्यासाठी नेहमी कोणती ना कोणती कायदेशीर नोटीस वाट बघत असते. मी एफआयआर किंग बनलो आहे, असेही ते म्हणाले.