वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हा गुन्हा नाही; केरळ हायकोर्टाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:29 AM2018-05-18T00:29:11+5:302018-05-18T00:29:11+5:30

गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई झाली, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला, अशा बातम्या नेहमीच झळकत असतात.

 Speaking on mobile while driving is not a crime; Kerala High Court's result | वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हा गुन्हा नाही; केरळ हायकोर्टाचा निकाल

वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हा गुन्हा नाही; केरळ हायकोर्टाचा निकाल

Next

कोची : गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई झाली, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला, अशा बातम्या नेहमीच झळकत असतात. पण सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचे सिद्ध होत नाही, तोवर वाहनचालक मोबाइलवर बोलत होता या मुद्द्यावरून त्याच्यावर कारवाई करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. अशी कारवाई करण्याची तरतूद कायद्यात नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
गाडी चालवताना मोबाइलवर बोलत असल्याने पोलिसांनी केरळ पोलीस कायद्याचे कलम ११८ ई व वाहन कायद्याचे कलम १८४ अन्वये एम. जे. संतोष याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याला त्याने न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने त्याला दोषी ठरविले नाही तसेच दंडही ठोठावलेला नाही. ही याचिका निकाली काढताना केरळ उच्च न्यायालयाने म्हटले की, वाहनचालकाच्या कृतीमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत नाही तोवर तो गुन्हा मानता येणार नाही. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हा गुन्हा असल्याची तरतूद पोलीस कायद्यात नाही. अशा कृतीबद्दल गुन्हा नोंदवायचा असेल तर प्रथम कायद्यात दुरुस्ती करावी लागेल.
>कलमाचा सर्रास वापर
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांवर गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिसांकडून हे कलम सर्रास वापरले जाते. न्यायालयाने नेमक्या याच कारवाईला आक्षेप घेतला आहे. गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाºयांना आता केरळ उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे बळच मिळणार आहे.

Web Title:  Speaking on mobile while driving is not a crime; Kerala High Court's result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.