Voter Id कार्ड आधारला जोडण्यासाठी आजपासून विशेष मोहीम, जाणून घ्या खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 10:33 AM2022-08-01T10:33:43+5:302022-08-01T10:34:56+5:30
Voter ID Card and Aadhaar Card Linking : व्होटर आयडी कार्ड आधार कार्डाला जोडण्यासाठी आजपासून निवडणूक आयोग विशेष मोहीम सुरू करणार आहे.
Voter ID Card and Aadhaar Card Linking : वोटर आयडी कार्ड आधार कार्डाला जोडण्यासाठी आजपासून निवडणूक आयोग (Election Commission of India) विशेष मोहीम सुरू करणार आहे. दरम्यान, आधार आणि व्होटर आयडी लिंक करणं हे पूर्णपणे मतदारांवर अवलंबून असणार आहे. केंद्र सरकारनं उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. कोणताही मतदार दोन ठिकाणी मतदान करून आणि मतदान यादी पारदर्शक असावी हा यामागील उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे.
मतदार स्वत:ही व्होटर आयडी कार्ड व्होटर हेल्पलाईन आणि निवडणूक आयोगानं सुरू केल्लया एनव्हीएसपी पोर्टलवर जाऊन लिंक करू शकतात. मतदार यादीला आधार कार्डाशी जोडण्याचं काम ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बाबी?
नव्या मतदारांसाठी ज्याचं वय १ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्षे किंवा अधिक असेल आणि त्याचं नाव मतदार यादीत नसेल, तर ती व्यक्ती आपल्या संबंधित क्षेत्रातील बीएलओ आणि जिल्हा कार्यालयात फॉर्म नंबर ६ भरून अर्ज करू शकता.
कोणत्याही मतदाराचं नाव मतदान यादीतून हटवण्यासाठी फॉर्म नंबर ६ आणि आधार कार्डाशी जोडण्यासाठी फॉर्म ६ आणि मतदार यादीत नावात चूक झाल्यात त्यात बदल करण्यासाठी फॉर्म ८ भरावा लागेल.
मतदार यादीत आपलं नाव तपासण्यासाठी किंवा अन्य माहितीसाठी https://eci.gov.in वर पाहता येईल. तसंच ऑनलाईन फॉर्म भरूनही तुम्हाला मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवता येईल.