चारा घोटाळा; सीबीआयचं विशेष कोर्ट आज देणार निकाल, प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 08:25 AM2017-12-23T08:25:21+5:302017-12-23T11:32:05+5:30
बिहारमधील बहुचर्चिच चारा घोटाळा प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे.
रांची- बिहारमधील बहुचर्चिच चारा घोटाळा प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. या घोटाळ्यात आरोपी असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांसारख्या दिग्गजांच्या नशिबाचा आजा फैसला होणार आहे. चारा घोटाळ्यात इतर 22 जणांवरही आरोप आहे. रांचीमधील सीबीआयचं विशेष कोर्ट या प्रकरणी आज निकाल देईल.
#TopStory A special CBI court in Ranchi to pronounce the verdict in fodder scam case in which RJD chief Lalu Prasad is an accused pic.twitter.com/z6AKuONGN6
— ANI (@ANI) December 23, 2017
2जी घोटाळ्याप्रकरणी आलेल्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनाही चारा घोटाळ्यातून सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. या घोटाळ्यात भाजपानेच आपल्याला फसवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पण, न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण भरवसा असून या प्रकरणात आपल्याला नक्की न्याय मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर केस चालविण्याचा राज्यपालांनी दिलेला आदेश रद्द केला.
चारा घोटाळा प्रकरण नेमकं काय ?
चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे.
लालू प्रसाद यादव पहिल्यांदा चारा घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव पत्नीला बिहारचं मुख्यमंत्री पद देऊन तुरूंगात गेले. त्यावेळी याचा कुठलाही परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर झाला नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलंहोतं. तसंच त्यांना 11 वर्ष कुठलिही निवडणूक लढविण्यावर बंद घातली होती.
चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.
लालू रांचीत दाखल
लालूप्रसाद यादव हे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह रांचीत पोहोचले आहेत. चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवास भोगावा लागतोय की जामीन मिळतोय, हे आज ठरणार आहे.
आज कोणत्या प्रकरणात निर्णय येणार?
देवघर तिजोरीतून अवैधरित्या 90 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात आज निर्णय सुनावला जाणार आहे. लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्र यांच्यासह एकूण 22 आरोपी या प्रकरणात आहेत. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आज अंतिम निकालाची अपेक्षा आहे.