सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष केंद्र

By admin | Published: September 20, 2015 10:48 PM2015-09-20T22:48:19+5:302015-09-20T22:48:19+5:30

केंद्र सरकार सायबर गुन्हे हाताळण्यासाठी एक अत्याधुनिक केंद्र स्थापन करणार आहे. चाईल्ड पोर्नोग्राफी आणि आॅनलाईन लैंगिक छळाला आळा घालण्याला हे केंद्र शीर्ष प्राधान्य देणार आहे.

Special Center to Prevent Cyber ​​Crime | सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष केंद्र

सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष केंद्र

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकार सायबर गुन्हे हाताळण्यासाठी एक अत्याधुनिक केंद्र स्थापन करणार आहे. चाईल्ड पोर्नोग्राफी आणि आॅनलाईन लैंगिक छळाला आळा घालण्याला हे केंद्र शीर्ष प्राधान्य देणार आहे.
सायबर गुन्हे प्रभावीपणे हाताळण्याच्या दिशेने रोडमॅप तयार करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या विशेषज्ञ समितीने केंद्रीय गृहमंत्रालयाला आपला अहवाल सादर केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात येत आहे. बालके आणि महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यात, विशेषत: आॅनलाईन लैंगिक छळाच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर घट केली जाण्याची आवश्यकता असल्याचे मत या समितीने आपल्या अहवालात व्यक्त केले आहे.
या समितीने आपल्या अहवालात पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारचे अश्लील साहित्य आणि वेबसाईटस्ची निगराणी आणि त्या वेबसाईटस् बंद करण्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच संबंधित कायदेही कडक बनविण्याची गरज आहे. आपल्या मुलांच्या सायबर जगताबाबतच्या कारवायांवर निगराणी ठेवण्यासाठी पालकांनी आता शिक्षित होण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी बालकांना सायबर मंचावर चांगल्या व्यवहाराबाबत शिक्षित केले पाहिजे.
या समितीने केलेल्या शिफारशीनुसार, चाईल्ड पोर्नोग्राफी आणि आॅनलाईन अत्याचारासह अन्य सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ४०० कोटी रुपये खर्चाचे ‘भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ (आयसी ४) या नावाने एक सायबर गुन्हे नियंत्रण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. हे आयसी ४ केंद्र विविध प्रकारचे गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित माहिती ठेवणाऱ्या सीसीटीएनटी व एनएटीजीआरआयडी या संस्थांना जोडण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी याआधीच समितीच्या शिफारशींची जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Special Center to Prevent Cyber ​​Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.