जी-२० निमित्त स्पेशल कमांड सेंटर, हवाई दलाकडे आकाशावर निगराणीची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 04:33 AM2023-09-01T04:33:15+5:302023-09-01T04:34:21+5:30

हवाई सुरक्षेची जबाबदारी हवाई दलाकडे सोपवण्यात आली असून, आकाशात उडणारी विमाने, ड्रोनपासून ते क्षेपणास्त्रांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. 

Special Command Center for G-20, Air Force responsible for aerial surveillance | जी-२० निमित्त स्पेशल कमांड सेंटर, हवाई दलाकडे आकाशावर निगराणीची जबाबदारी

जी-२० निमित्त स्पेशल कमांड सेंटर, हवाई दलाकडे आकाशावर निगराणीची जबाबदारी

googlenewsNext

- संजय शर्मा

नवी दिल्ली : जी-२० संमेलनाच्या आयोजनस्थळी प्रगती मैदानात अमेरिका, रशिया, ब्रिटन, चीनसह सर्व देशांचे कॅम्प ऑफिस व स्पेशल कमांड सेंटर तयार केले जात आहेत. हे सर्व देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाप्रमाणे तेथूनच काम करणार आहेत. हवाई सुरक्षेची जबाबदारी हवाई दलाकडे सोपवण्यात आली असून, आकाशात उडणारी विमाने, ड्रोनपासून ते क्षेपणास्त्रांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. 
जी-२० देशांच्या संमेलनासाठी प्रगती मैदानातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासह सर्व राष्ट्राध्यक्षांचे कॅम्प ऑफिस व कमांड सेंटर बनविण्यात येत आहेत. तेथून ते त्या देशांच्या राजधानींशी थेट जोडलेले असतील. जी-२० देशांच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय एजन्सींना जबाबदारी देण्यात आली आहे. एनआयए, सीआरपीएफ, दिल्ली पोलिसांची तीन स्तरीय सुरक्षा असेल. त्याआधी प्रत्येक देशाच्या खाजगी सुरक्षा संस्थांची सुरक्षा असेल. हवाई सुरक्षेची जबाबदारी भारतीय हवाई दलाकडे सोपवण्यात आली आहे. आकाशात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येईल व तत्काळ लक्ष्य करण्यात येणार आहे. विमानांचे उड्डाण, ड्रोन, क्षेपणास्त्रांना तत्काळ उत्तर देण्यासाठी हवाई दलाची तैनाती असेल. सर्व व्हीआयपींच्या ताफ्यावर हेलिकॉप्टरची निगरानी असेल. 

महिलांसाठी प्रशिक्षित महिला कमांडो
    महिलांसाठी विशेष महिला आयटीबीपीच्या प्रशिक्षित महिला कमांडोंची तैनाती केली जाणार आहे.
    माध्यमांचीही अनेक स्तरांवर तपासणी होणार आहे. माध्यमांसाठी विदेश मंत्रालयाकडून विशेष पासेस दिले जात आहेत.
    जी-२० देशांच्या माध्यमांना त्यांच्या संबंधित देशांच्या विदेश मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर आणि जबाबदारी घेतल्यानंतरच पासेस दिले जात आहेत.

Web Title: Special Command Center for G-20, Air Force responsible for aerial surveillance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.