नेत्रचिकित्सक फर्डिनॅन्ड मोनोयेर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गुगलडुडल
By admin | Published: May 9, 2017 03:52 PM2017-05-09T15:52:27+5:302017-05-09T16:38:31+5:30
गुगलनं डुडलच्या माध्यमातून फ्रान्समधील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक फर्डिनँड मोनोयेर यांना त्यांच्या 181 व्या वाढदिवसानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - गुगलनं डुडलच्या माध्यमातून फ्रान्समधील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक फर्डिनॅन्ड मोनोयेर (Ferdinand Monoyer) यांना त्यांच्या 181 व्या वाढदिवसानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलनं विशेष डुडल बनवून मोनोयेर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मोनोयेर व त्यांच्या कार्याबाबतच्या माहितीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आला आहे.
फर्डिनॅन्ड मोनोयेर यांचा जन्म 9 मे 1836 साली झाला होता व 1912 साली वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले होते. डोळ्यांची दृष्टी तपासण्यासाठीच्या युनिट डायओप्टरचे (यंत्र) ते जनक मानले जात. डायओप्टर या यंत्राद्वारे भिंगाच्या सहाय्याने डोळ्यांच्या दृष्टीची शक्ती तपासली जाते. जेव्हा एखादा रुग्ण डोळे तपासणीसाठी डॉक्टरांकडे जातात तेव्हा सुरुवातीला वेगवेगळे शब्द आणि आकार त्या रुग्णाला पाहण्यास सांगितले जाते. त्यानुसार डॉक्टर रुग्णाच्या डोळ्यांच्या दृष्टीची तपासणी केली जाते. या यंत्राला डायओप्टर असे म्हटले जाते.
डोळे तपासणीसंबंधीचा हा चार्ट 100 वर्षांपूर्वी फर्डिनॅन्ड यांनी बनवला होता. या चार्टला मोनोयेर चार्ट या नावानंही ओळखले जाते. याच फर्डिनॅन्ड मोनोयेर यांचा 181 वा वाढदिवस गुगल आज (9 मे)डुडलच्या माध्यमातून साजरा करत आहे. गुगलनं आपल्या डुडलमध्ये "ओ" अक्षरांच्या जागी अॅनिमेटेड डोळे दाखवले आहेत. शेजारी मोनोयेर चार्टदेखील दिसत आहे. येथे डायोप्टरनुसार लहान अक्षरापासून ते मोठ्या आकारातील अक्षरांचा अॅनिमेटेड चार्टही येथे दाखवण्यात आला आहे.
या डुडलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोनोयेर यांच्यासंबंधीची संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तुम्ही या चार्टचं योग्यपद्धतीनं निरीक्षण केले तर तुम्हाला तेथे फर्डिनॅन्ड मोनोयेर यांचे नावदेखील दिसेल. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलनं आजचे डुडल "व्हिजन क्लॅरिटी" संदर्भात बनवले आहे.