६८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलचे 'डूडल'द्वारे खास अभिवादन
By admin | Published: January 26, 2017 09:08 AM2017-01-26T09:08:33+5:302017-01-26T09:08:33+5:30
गूगलने खास डूडल तयार करत 'प्रजासत्ताक दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - देशभरात आज ६८ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येत असून थोड्याच वेळात राजधानी दिल्लीतही पथसंचलन सुरू होईल. प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सोशल मीडियावरही दिसत असून गूगल डूडल, फेसबूक, ट्विटर अशा अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांच्या विविध पोस्ट्स दिसत आहेत.
गूगलने तर 'प्रजासत्ताक दिना'चे औचित्य साधत खास डूडल तयार करत शुभेच्छा दिल्या आहेत.
26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यामुळे आजचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त दिल्लीत पथसंचलन होणार असून अबूधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद हे यंदाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.