'मन की बात'मधून मोदींचा विद्यार्थ्यांना खास मंत्र
By admin | Published: January 29, 2017 11:41 AM2017-01-29T11:41:03+5:302017-01-29T11:43:48+5:30
लवकरच देशात विद्यार्थ्यांच्या बोर्ड परिक्षा सुरू होणार आहेत. यावेळी बोलताना मोदींनी विद्यार्थांना खास टीप दिली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रेडिओद्वारे 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला संबोधित केलं. 'मन की बात'चा हा 28 वा भाग होता. 30 जानेवारीला महात्मा गांधींची पुण्यिथी आहे त्या दिवशी सकाळी 11 वाजता 2 मिनिट मौन पाळण्याचं आवाहन मोदींनी केलं. तसेच प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्कार मिळालेल्या जवानांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचंही अभिनंदन केलं.
लवकरच देशात विद्यार्थ्यांच्या बोर्ड परिक्षा सुरू होणार आहेत. यावेळी बोलताना मोदींनी विद्यार्थांना खास टीप दिली. परिक्षेच्या काळात तुम्ही जेवढे आनंदी राहाल तितके जास्त तुम्हाला गुण मिळतील असं म्हणत 'स्माइल मोअर, स्कोर मोअर' असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत पंतप्रधान विद्यार्थ्यांना म्हणाले, ' स्पर्धा स्वत:शी करा.' परिक्षेच्या दिवसांमध्ये घरातील वातावरणात तणाव असू नये, एखाद्या सणाप्रमाणे घरचं वातावरण असावं असं त्यांनी पालकांना सांगितलं. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
पाच राज्यांमध्ये होणा-या निवडणुकीतील मतदार प्रभावित होतील असं काहीही मन की बातमधून बोललं जाऊ नये या अटीवर निवडणूक आयोगाने मन की बातला परवानगी दिली होती.