नावे वगळलेल्या मतदारांसाठी पुन्हा खास संधी
By admin | Published: July 6, 2014 01:47 AM2014-07-06T01:47:49+5:302014-07-06T01:47:49+5:30
गेल्या दोन वर्षात मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करताना मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 3क् लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून ‘चुकीने’ वगळली गेल्याची कबुली निवडणूक आयोगाने प्रथम दिली
Next
नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षात मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करताना मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 3क् लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून ‘चुकीने’ वगळली गेल्याची कबुली निवडणूक आयोगाने प्रथम दिली असून या चुकीचे परिमाजर्न करण्यासाठी वगळल्या गेलेल्या या मतदारांना नावनोंदणीची खास संधी देण्याचे आयोगाने ठरविले आहे.
याद्यांमधून नावे गहाळ झालेल्या या मतदारांमध्ये सुमारे 14 लाख मतदार एकच्या मुंबईतील असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणो आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई, पुण्यात मतदारांची नावे याद्यांमधून मोठय़ा प्रमाणावर वगळली गेल्याचे स्पष्ट झाले होते व ओळखपत्र असूनही त्यांना मतदान न करता आल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
पावसाळ्य़ानंतर होणा:या राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा असा गोंधळ होऊ नये यासाठी उपाय योजण्याचे आयोगाने त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार 9 ते 3क् जून दरम्यान मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मात्र ही मोहीम सर्वसाधारण स्वरूपाची होती व ज्यांची नावे आधी यादीत होती व नंतर वगळली गेली अशा मतदारांसाठी त्यात विशेष भर नव्हता. मात्र आता यादीतून वगळल्या गेलेल्या या मतदारांची नावे
नोंदवून घेण्यासाठी निवडणूक आयोग विशेष प्रयत्न करणार असून त्यासाठी पूर्वी कधीही अनुसरला नाही, असा मार्ग आयोग स्वीकारणार आहे.
आयोगाच्या सूत्रंनुसार
नावे वगळलेल्या या 3क् लाख मतदारांना आयोगाकडून व्यक्तिगत
पत्रे पाठविली जाणार आहेत. या पत्रमध्ये नाव नोंदवून घेण्याचे आवाहन केलेले असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पूर्वीच्या पत्त्यावर पत्र
वगळल्या गेलेल्या मतदारांचे आधी जेव्हा यादीत नाव होते त्यावेळी नोंदलेल्या पत्यावर आयोग ही पत्रे पाठविणार आहे. जे मतदार अजूनही पूर्वीच्या त्याच पत्त्यावर राहात असतील त्यांना ही पत्रे मिळतील. ज्यांनी दरम्यानच्या काळात वास्तव्याचे ठिकाण बदलले असेल त्यांना ही पत्रे मिळणार नाहीत व याद्यांमध्ये सुधारणा करताना अशा मतदाराचे नाव योग्यपणो वगळले गेले होते, असे मानले जाईल, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
च्नावे वगळल्या मतदारांसाठी आयोगाकडून असा उपक्रम आयोगाकडून प्रथम राबविला जात आहे. जास्तीत जास्त मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आयोगाच्या कटिबद्धतेशी हे सुसंगतच आहे, असे निवडणूक आयोगाचे महासंचालक अक्षय राऊत यांनी दिली.